सोलापूर : मराठवाड्याला जोडणाºया सोलापूर-बार्शी रस्त्याची चाळण झाली होती़ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते़ याबाबत वाहनधारकांनी व्यक्त केलेली नाराजी व संस्था, संघटनांनी दिलेल्या रास्ता रोकोच्या इशाºयाबाबत ‘लोकमत’ने ‘सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास’ या मथळ्याखाली १२ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर तातडीने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले़ शुक्रवारी गुळवंची, कारंबा परिसरातील रस्ते डांबर, खडी टाकून बुजविण्यात आले.
सध्या सोलापूर-बार्शी मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून आपलं घर गाठताना मरणाच्या दाढेतून जातोय की काय, अशी प्रचिती येत आहे़ सोलापूर-बार्शी या महामार्गावरील चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. त्यामधूनही दररोज एखाद्दुसरा लहान-मोठा अपघात होत आहे तर काही जणांना अपंगत्व आलेले आहे. सोलापूरहून बार्शीकडे निघाले असता मार्डी फाट्यापासून बार्शीपर्यंत हा रस्ता खराब झालेला आहे़ यातच गुळवंची, कारंबा, नान्नज, वडाळा, गावडी दारफळ, राळेरास, शेळगाव, वैराग, पानगाव, सासुरे परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ या खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक गाड्यांच्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ याबाबत लोकमतने १२ नोव्हेंबर रोजी ‘सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले.
पावसाबरोबरच जडवाहतुकीमुळे लागली रस्त्याची वाटनवरात्रोत्सव काळात तुळजापूरहून सोलापूरला येणारी जडवाहतूक तुळजापूर-बार्शीमार्गे सोलापूर अशी वळविण्यात आली होती़ दररोज हजारो जडवाहतूक या बार्शी-सोलापूर मार्गावरून जात होती़ एवढेच नव्हे तर मागील महिन्याभरापासून सातत्याने पडणाºया पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले़ काही ठिकाणी तर दोन-दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत़ रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे़ एवढेच नव्हे तर दिवसा गाडी चालविताना खड्ड्यात गाडी गेल्यावर दुचाकीस्वारांचा गाडीवरील ताबा सुटून छोटे-मोठे अपघात होतानाचे पाहावयास मिळत आहे़
सोलापूर-बार्शी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले. पण मार्डी फाटा ते बार्शीपर्यंतचा रस्ता खराब आहे. वास्तविक पाहता मार्डी फाट्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यायला हवे होते. मात्र मध्येच गुळवंची, कारंबा परिसरातील खड्डे बुजविणे कसे सुरू झाले, हे कळायला मार्ग नाही़ पण जाऊ दे रस्ता दुरुस्ती सुरू झाली, हेही काय कमी नाही़ - अमोल सुतार, भाजयुमो, उत्तर तालुका सरचिटणीस