सोलापूर बाजार समिती ; शेतकºयाला मारहाण केलेल्या अडत्याचा परवाना रद्द करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:56 PM2018-12-22T12:56:32+5:302018-12-22T12:57:50+5:30
सोलापूर बाजार समिती सभा : सभापतीसाठी नवीन गाडीचा विषय पेंडिंग
सोलापूर : शेतकºयाला मारहाण करणाºया अडत्याचा परवाना रद्द तर शेतकºयांच्या मालाचे पैसे न देणाºया अडत्याला दिलेला गाळा काढून घेण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला. सभापतीसाठी नवीन गाडी घेण्याच्या ठरावावर तूर्त हा निर्णय थांबवावा व दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना मदत करावी अशी चर्चा झाली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा शुक्रवारी सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत एकूण ५३ विषयांवर चर्चा झाली. बाजार समितीच्या आवारात माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्याच्या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संचालक शहाजी पवार यांनी पुतळा उभारणीसाठी शासन पातळीवरच्या परवानग्या मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन असे सांगितले.
शेतकºयांसाठी भोजन या विषयावर एक रुपयात जेवण यापुढेही सुरू रहावे, गुणवत्तेचे जेवण मिळावे यासाठी वाढीव खर्च बाजार समिती व व्यापाºयांनी सोसावा असे संचालकांनी मत व्यक्त केले. नव्याने निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली.
कांद्याच्या पोत्यावर झोपलेल्या शेतकºयास शिवीगाळ व मारहाण केल्यामुळे मे. फारुक हबीबल्ला मोसंबीवाले अँड कंपनीचे चालक हबीबल्ला बागवान यांचा परवाना रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला. शेतकºयांच्या शेतीमालाची बिले थकविणाºया म.कैफ ट्रेडर्स पेढी इस्माईल हाजी म. इसाक बागवान चालक इस्माईल बागवान यांचा परवाना याअगोदरच रद्द करण्यात आला आहे. त्यानंतरही शेतकºयांचे पैसे दिले नसल्याने त्यांना दिलेला फळे व भाजीपाला विभागातील गाळा काढून घेण्याचा निर्णय झाला. अन्य विषयावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.
बैठकीला पालकमंत्री देशमुख, शिवानंद पुजारी व प्रकाश चोरेकर वगळता अन्य संचालक उपस्थित होते. बाजार समितीत सुरू असलेल्या प्रकल्पातील गांडूळ प्रतिकिलो चार रुपयाने विक्री करण्याचा तसेच सध्या सभापतीसाठी असलेली गाडी दुष्काळी स्थितीमुळे विक्री करून नव्याने न घेता हाच पैसा शेतकºयांसाठी खर्च करण्याचा मुद्दा श्रीमंत बंडगर यांनी मांडला. उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी नव्याने दोन गाड्या घ्या व सध्याची जुनी गाडी विक्री करू नये असा मुद्दा मांडला. संचालक शहाजी पवार, अशोक निंबर्गी व श्रीमंत बंडगर यांनी बैठक भत्ता लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला देण्यात आला.
पालकमंत्री आजही गैरहजर
- बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख आजच्या बैठकीलाही गैरहजर होते. सहा महिन्यात ते एकाही बैठकीला आले नाहीत,कधीतरी बैठकीला हजर राहिले पाहिजे अशी नोंद करा असे संचालक शहाजी पवार म्हणाले. यावर नोंद करू का?, असे म्हणत सभापती नोंद करु का?,असे मिश्किलपणे म्हणाले.
सत्कार बाजार समितीचा अन् कर्मचाºयांचा..
- तज्ज्ञ संचालक शहाजी पवार, प्रा. अशोक निंबर्गी व श्रीमंत बंडगर यांचा बाजार समितीच्या वतीने सभागृहात सत्कार करण्यात आला. बैठक संपल्यानंतर सर्व संचालक निघून गेले. त्यानंतर कर्मचाºयांच्या वतीने तज्ज्ञ संचालकांचा सचिव मोहन निंबाळकर व अन्य अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीत सत्कार करून फटाकेही उडविण्यात आले.