Solapur: आठ दिवसाची डेडलाइन अन्यथा सोलापूर महापालिकेची रस्ते, ड्रेनेज, डागडुजीची कामे थांबणार; ठेकेदारांनी दिला महापालिका प्रशासनाला इशारा

By Appasaheb.patil | Published: February 6, 2023 02:35 PM2023-02-06T14:35:45+5:302023-02-06T14:46:32+5:30

Solapur News: साेलापूर महापालिकेची कामे करणाऱ्या अनेक ठेकेदारांची तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामांची बिले प्रलंबित आहेत. प्रशासकीय स्तरावर अडवणुकीचे धाेरण कायम आहे.

Solapur: Eight days deadline otherwise road, drainage, repair works of Solapur municipality will stop; The contractors warned the municipal administration | Solapur: आठ दिवसाची डेडलाइन अन्यथा सोलापूर महापालिकेची रस्ते, ड्रेनेज, डागडुजीची कामे थांबणार; ठेकेदारांनी दिला महापालिका प्रशासनाला इशारा

Solapur: आठ दिवसाची डेडलाइन अन्यथा सोलापूर महापालिकेची रस्ते, ड्रेनेज, डागडुजीची कामे थांबणार; ठेकेदारांनी दिला महापालिका प्रशासनाला इशारा

Next

- आप्पासाहेब पाटील

साेलापूर : महापालिकेची कामे करणाऱ्या अनेक ठेकेदारांची तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामांची बिले प्रलंबित आहेत. प्रशासकीय स्तरावर अडवणुकीचे धाेरण कायम आहे. या अडचणी आठ दिवसांत दूर न झाल्यास रस्ते, ड्रेनेज लाइनसह इतर कामे बंद करू, असा इशारा महापालिका काॅन्ट्रॅक्टर्स असाेसिएशनने दिला आहे.

असाेसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ आणि सहकाऱ्यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन दिले. दुधाळ म्हणाले, पालिकेत ३५० हून अधिक ठेकेदार पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन, गलिच्छ वस्ती सुधार याेजना, नगर अभियंता आणि झाेन कार्यालयातील कामे करतात. या ठेकेदारांनी अनेकदा आपल्या अडचणी प्रशासनासमाेर मांडल्या. ठेकेदारांना जीएसटी रकमेचा फरक मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामांची बिले मिळविण्यासाठी ठेकेदार लेखाविभाग, खातेप्रमुख आणि अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात फेऱ्या मारतात. अधिकाऱ्यांकडून बिलांवर निर्णय हाेत नाही. उलट मानसिक त्रास सहन करावा लागताे.

दरम्यान, अनेक ठेकेदारांनी बँकांची कर्जे काढून कामे पूर्ण केली आहेत. ही देणी कशी द्यायची? काम मंजूर करताना सुरक्षित रक्कम ठेवून घेतली जाते. ही रक्कम परत मिळवितानाही नाकीनव येतात. अशा अनेक विषयांवर निर्णय हाेत नसल्याने सर्वच मक्तेदार पालिकेला वैतागले आहेत. आयुक्तांनी आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास काम बंद करणे अटळ आहे.

Web Title: Solapur: Eight days deadline otherwise road, drainage, repair works of Solapur municipality will stop; The contractors warned the municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.