सोलापूर बाजार समितीच्या गणांमध्ये हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश, जिल्हाधिकाºयांचे स्पष्टीकरण, आरक्षणाची लॉटरी आज काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:34 PM2018-01-11T14:34:41+5:302018-01-11T14:38:51+5:30
हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश करूनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण निश्चिती करण्यात येणार आहे. एकूण १५ गणांची निश्चिती होईल. आरक्षणाची लॉटरीही दोन दिवसात काढली जाईल.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश करूनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण निश्चिती करण्यात येणार आहे. एकूण १५ गणांची निश्चिती होईल. आरक्षणाची लॉटरीही दोन दिवसात काढली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी सांगितले.
बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा कार्यक्षेत्रातील शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. सोलापूर बाजार समितीचे उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही तालुक्यातील गावांची यादी जिल्हाधिकाºयांकडे सादर करून गणनिश्चिती करण्याचे काम सुरू आहे. यापार्श्वभूमीवर बाजार समितीच्या प्रशासनाने हद्दवाढ भागात गेलेली उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावे वगळून जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर केल्याची चर्चा होती. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, ही गावे वगळण्याचा प्रश्न नाही. शासनाने बाजार समितीचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. महापालिका हद्द असली तरी या भागातही शेती असू शकते. येथील शेतकºयांचाही समावेश होऊ शकतो. मुळात तहसीलदारांनी गावे निश्चित करून द्यायची आहेत. लवकरच १५ गण निश्चित करण्याची कार्यवाही होईल.
--------------
तहसीलदारांना दिले आदेश
- बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी सभापती दिलीपराव माने यांच्या गटात मुख्य सामना रंगणार आहे. यात आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांचीही भूमिका महत्त्वाची असेल; मात्र सध्या देशमुख आणि माने यांच्यात प्रशासकीय पातळीवरून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. प्रशासनाकडे सुरुवातीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील ९० गावांचा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ३८ गावांचा समावेश करण्यात आला होता. हद्दवाढ भागातील १४ गावे वगळण्यात आली होती. दिलीप माने गटाने यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे आक्षेप नोंदविले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी हद्दवाढ भागातील गावांचा समावेश करूनच यादी तयार करण्याचे आदेश उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहेत.
---------------
ही गावे वगळली होती
कसबे सोलापूर, मजरेवाडी, नेहरूनगर, सलगरवाडी, केगाव, शिवाजी नगर, बाळे, कुमठे, सोरेगाव, प्रतापनगर, शेळगी, दहिटणे, देगाव, बसवेश्वर नगर आदी गावे वगळण्यात आली होती. आता या गावांसह बाजार समितीचे गण निश्चित होणार आहेत.