सोलापुरात आता दररोज होणार दीड लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:39 AM2020-04-11T08:39:36+5:302020-04-11T08:41:11+5:30

कोरोनाशी लढा; सोलापुरात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही..

Solapur now produces 1.5 lakh liters of sanitizer every day | सोलापुरात आता दररोज होणार दीड लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन

सोलापुरात आता दररोज होणार दीड लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन

googlenewsNext
ठळक मुद्दे- सोलापूरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू- कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज- जिल्हाबंदी, नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांनी कडक तपासणी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आठ डिस्टिलरी आणि तीन भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य निर्मिती करणाºया कारखान्यांना सॅनिटायझर निर्मिती करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून या बारा कारखान्यातून आता दररोज एक लाख तीस हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन होईल.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यात सॅनिटायझर अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे सॅनिटायझरची निर्मिती वाढविण्यास सांगण्यात आले होते. यापैकी जिल्ह्यात असणारे मद्य निर्मिती कारखाने आणि डिस्टिलरी यांना सॅनिटायझरची निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली. अल्कोहोल चा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा दरही निश्चित करण्यात आला आहे.  

 सॅनिटायझरची निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आलेल्या प्रकल्पांची नावे आणि दररोजची निर्मिती क्षमता पुढीलप्रमाणे 

  • - मे. ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरी लिमिटेड, श्रीपूर, ता. माळशिरस, 6 हजार लिटर          
  • - मे. विष्णूलक्ष्मी को-आॅपरेटिव ग्रेप डिस्टलरी  एमआयडीसी अक्कलकोट रोड, 10 हजार लिटर बी. एल.  - मे. विठ्ठल कॉपोर्रेशन लिमिटेल, म्हैसगाव, ता. माढा, 30 हजार बी. आय.
  •  - मे. फॅबटेक सूगर प्रॉईवेट लिमिटेड, नंदून बालाजीनगर, ता. मंगळवेढा, 30 हजार बी.एल.
  • - मे. जकराया सुगर लिमिटेड, वटवटे, ता. मोहोळ, 10 हजार बी.एल 
  • - मे. युटोपियन सुगर लिमिटेड, पतंगनगर, कचरेवाडी, ता. मंगळवेढा, 10 हजार बी. एल.
  • - मे. खंडोबा डिस्टलरी प्रायवेट लिमिटेड, टेंभूर्णी ता. माढा, 10000 बी. एल. 
  • - मे. लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड सुभाषनगर, ता. उत्तर सोलापूर, 10 हजार बी.एल. 
  • - मे. विठ्ठलराव शिंदे एस एस के लिमिटेड, गंगामाई नगर, पिंपळनेर, ता. माढा, 10 हजार बी.एल. 
  • - मे. श्री. पांडुरंग एसएसके लिमिटेड श्रीरपूर, ता. माळशिरस, 5 हजार बी.एल. 
  • - मे. श्री. सिध्देश्वर एसएसके लिमिटेड कुमठे, सोलापूर, 5०० लिटर बी. एल.


 

Web Title: Solapur now produces 1.5 lakh liters of sanitizer every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.