‘सोलापूर लाल’ डाळिंब पोहोचले जगभरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 03:55 AM2017-12-04T03:55:30+5:302017-12-04T03:55:36+5:30
डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी लोहयुक्त संकरित वाणाचा शोध लावला असून, त्यास ‘सोलापूर लाल’ हे नाव दिले आहे.
सोलापूर : डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी लोहयुक्त संकरित वाणाचा शोध लावला असून, त्यास ‘सोलापूर लाल’ हे नाव दिले आहे. सोलापुरात संशोधित झालेले हे वाण ‘सोलापूर लाल’ नावाने जगभरात पोहोचले आहे, असे येथील डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल यांनी शुक्रवारी सांगितले.
कॉलेज आॅफ फार्मसीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘डाळिंबाचे अन्न, औषध व सौंदर्य प्रसाधनातील औद्योगिक संशोधन’ या विषयावर ते बोलत होते. डाळिंबाच्या पदार्थांच्या उत्पादकतेसंदर्भात संशोधनासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल,’ अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी या वेळी दिली.