सोलापूर विद्यापीठाचा शुक्रवारी पंधरावा दीक्षांत समारंभ !

By Appasaheb.patil | Published: December 23, 2019 04:41 PM2019-12-23T16:41:02+5:302019-12-23T16:45:34+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समारंभ

Solapur University celebrates its 15th convocation on December 27! | सोलापूर विद्यापीठाचा शुक्रवारी पंधरावा दीक्षांत समारंभ !

सोलापूर विद्यापीठाचा शुक्रवारी पंधरावा दीक्षांत समारंभ !

googlenewsNext
ठळक मुद्दे  11 हजार 427 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार65 पीएच.डी पदवी तर 54 सुवर्णपदकाचेही वितरण होणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समारंभ

सोलापूर - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत समारंभ 27 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मंडपात होणार असून यावेळी एकूण 11 हजार 427 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 65 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी हे असणार आहेत. प्रारंभी सकाळी दहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शाह हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. 

या दीक्षांत समारंभात एकूण 11 हजार 427 पैकी सहा हजार 92 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर पाच हजार 335 विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक शहा यांनी सांगितले.  

 यंदा 65 जणांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा 54 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये तब्बल 43 मुली तर अकरा मुलांचा समावेश आहे.

दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सध्या या समित्यांचे काम सुरू असल्याचे चित्र विद्यापीठात पाहावयास मिळत आहे.

 या पत्रकार परिषदेस कुलसचिव, डॉ. व्ही. बी. घुटे, मा. प्रभारी प्र-कुलगुरु, डॉ. विकास कदम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा, डॉ. रविंद्र चिंचोलकर, उपकुलसचिव डॉ. यु. व्ही. मेटकरी आदी उपस्थित होते.

Web Title: Solapur University celebrates its 15th convocation on December 27!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.