सोलापूर: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईनच घ्या अशी सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी १२ जुलै रोजी सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरासाठी तिसरा स्तर लागू केला आहे. त्यामुळे ही सभा खुल्या सभागृहात घेण्यास परवानगी द्यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव दिला होता.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डेल्टा प्लसच्या संसर्ग भीतीमुळे खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनातील महत्त्वाच्या सर्व बैठका ऑनलाइन घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच महापालिकेची सभा झाली आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑनलाईन घ्यावी अशी सूचना केली आहे. त्यामुळे सोमवारी होणारी सभा ऑनलाईनच होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.