सोलापूरकर गाफीलच; २० रुपयांच्या मास्कसाठी ७८० प्रवाशांनी भरले दीड लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 04:58 PM2022-01-21T16:58:13+5:302022-01-21T16:58:19+5:30

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांत केलेल्या विशेष तिकीट तपासणीत २३ हजार १०४ विनातिकीट प्रवासी ...

Solapurkar is oblivious; 780 passengers paid Rs 1.5 lakh for a Rs 20 mask | सोलापूरकर गाफीलच; २० रुपयांच्या मास्कसाठी ७८० प्रवाशांनी भरले दीड लाख

सोलापूरकर गाफीलच; २० रुपयांच्या मास्कसाठी ७८० प्रवाशांनी भरले दीड लाख

googlenewsNext

सोलापूर - मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांत केलेल्या विशेष तिकीट तपासणीत २३ हजार १०४ विनातिकीट प्रवासी आढळून आले. या कारवाईत १ कोटी ४१ लाख २९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यात रेल्वे स्थानकाबरोबरच मेल-एक्स्प्रेस प्रवाशांचा समावेश आहे. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या गाडीत सर्वाधिक फुकटे प्रवासी दिसत असल्याचे पाहणीत आढळून आले.

----------

वर्षभरात अडीच लाख फुकटे प्रवासी आढळले

१ एप्रिल २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या कालवधीत सोलापूर विभागात विनातिकीट प्रवाशांविरोधातील कारवाईत एकूण २ लाख ५३ हजार प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून १४ कोटी २० लाख रुपये दंड गोळा करण्यात आला. वारंवार कारवाई करण्यात येत असली तरी फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

---------

मास्क न वापरणारे ७८० प्रवासी....

कोरोनामुळे रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपये दंड करण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांत याच कालावधीत मुखपट्टी न वापरणारे ७८० प्रवासी आढळून आले असून, त्यांच्याकडून १ लाख २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

----------

यांनी केली कारवाई...

वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व साहाय्यक वाणिज्य प्रबंधक हर्षित बिश्नोई यांच्या देखरेखीखाली, मंडल मुख्य तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार, संजय कांबळे, तिकीट चेकिंग कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या सहकार्याने विशेष तिकीट चेकिंग अभियान राबविण्यात आले.

-----------

प्रवासादरम्यान अधिकृत रेल्वे तिकीट घेऊन रेल्वेेचा प्रवास करावा व अधिकृत खाद्य विक्रेत्यांकडून खाद्य पदार्थ घेऊन रेल प्रशासनास सहकार्य करावे. विनातिकीट, विनामास्क प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल.

 

Web Title: Solapurkar is oblivious; 780 passengers paid Rs 1.5 lakh for a Rs 20 mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.