शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

सोलापूरच्या केळीची आखाती देशात वाढली गोडी; ८० हजार मे. टनाची निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 5:33 AM

करमाळा तालुक्यात दरवर्षी अडीच लाख मे. टन केळीचे उत्पादन होत असून, ८० हजार मे. टन केळी आखाती देशात निर्यात केली जाते.

- नासीर कबीरकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याने केळी उत्पादनात दबदबा तयार केला आहे. केळी पिकासाठी पोषक वातावरण असल्याने या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत आहे. निर्यातक्षम केळीचे उत्पादन होत असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. करमाळा तालुक्यात दरवर्षी अडीच लाख मे. टन केळीचे उत्पादन होत असून, ८० हजार मे. टन केळी आखाती देशात निर्यात केली जाते.

केळीला १८ रुपयांचा दर सोलापुरी केळी दर्जेदार व निर्यातक्षम असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलोला सध्या १६ ते १८ रुपये किलोचा दर मिळू लागला आहे. गतवर्षी निर्यातक्षम केळीला प्रति किलो तब्बल २५ ते २६ रुपयांचा दर मिळाला होता.

परिसर बनतोय निर्यातक्षम केळीचे हबकरमाळा तालुक्यातील उजनी धरण परिसरातील कंदर, वांगी, शेटफळ, उमरड, वाशिंबे परिसराबरोबरच पूर्व भागातील वरकटणे सरपडोह, निंभोरे, सौंदे, गुळसडी या गावांच्या परिसरातील शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत. करमाळा तालुक्यात वर्षभर केळीची लागवड केली जात असल्याने या परिसरातून नियमितपणे केळीचा पुरवठा होतो. त्यामुळे केळी व्यापारी नियमितपणे या ठिकाणी खरेदीसाठी येतात. यामुळे करमाळा तालुका केळी पिकासाठी हब होऊ लागला आहे. 

निर्यातील २५ टक्के वाटाइराण, ओमान, दुबई यासारख्या आखाती देशांत केळीला मोठी मागणी आहे. देशभरातून दरवर्षी साधारण १६०० कंटेनर केळी तिकडे निर्यात होते. यामधील २५ टक्के केळीचा पुरवठा एकट्या करमाळा तालुक्यातून होतो. देशाला परकीय चलन मिळवून देण्यातही तालुक्यातील शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. 

टॅग्स :BananaकेळीSolapurसोलापूर