तडवळे/सोलापूर - बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे सूपूत्र शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं जीझ झालं आहे. शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला, आपला लेक एवढा मोठा साहेब झाला, या आनंदाने आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले. भूतकाळाती आठवणी जागवताना, वडील गोपीनाथ आणि आई सुदामती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर, थोरला भाऊ दादासाहेब यानंही लहान्या भावाचं अभिनंदन केलं, गावातील मित्रांनी एकत्र येऊन शरणच्या गळ्यात हार घालून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
शरणने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे, या आपल्या मूळगावातच पूर्ण केले. त्यानंतर, बारावीचे शिक्षण विद्या मंदीर वैराग तर वालचंद कॉलेज इंजिनिअरींग कॉलेज सांगली येथे २०१६ मध्ये बी टेक झाले. पुढील शिक्षणासाठी इंडीयन इन्स्टुट ऑफ सायन्स बेंगलोर मधून २०१८मध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केली. एम.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका खासगी कंपनीने वीस लाखाचे पॅकेज देऊ केले होते पण शरण यांनी ते पॅकेज नाकारले. दरम्यानच्या काळात, युपीएससी परीक्षांच्या अभ्यास शरण यांनी केला होता. त्यामुळे, नोकरीवर न जाता, आपण युपीएससी परीक्षेतून सरकारी सनदी अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना, शरणने पहिल्याच प्रयत्नात आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. मुलगा मोठा अधिकारी झालाय, पण ही वस्तुस्थिती आजही आई-वडिलांना स्वप्नासारखीच वाटतेय. लेकानं घराण्याचं नाव काढलं, गावाचं नाव काढलं एवढच काय आई-वडिलांना लय भारी वाटतंय. पण, पोरंग नेमक कोणता 'साहेब' होणार हे अद्यापही त्यांना माहिती नाही.
शरणने ऑगस्ट २०१९मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचीपरीक्षा दिली आणि ते देशात आठव्या क्रमांकांने उत्तीर्ण झाले सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सद्वारे विविध दलामध्ये भरती केली जाते शरण हा सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेमध्ये पाहिल्याच प्रयत्नात देशात आठवा आला आहे या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, सेंट्रल रिर्झव्ह पोलीस फोर्स CRPF, सेंट्रल इंडी स्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स CISF, इंडो -तिबेटीयन बॉर्डर पोलीस IT BP, सशस्त्र सीमा बल SSB या दलामध्ये निवड केली जाते. शरण कांबळेचे आईवडील मोलमजूरी करतात, मुलगा हुशार असल्यामूळे त्यांनी रक्ताचे पाणी करून मुलाला क्लास वन बनविले शरण कांबळे उर्तीर्ण झाल्याचे कळताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली गावातील अनेकांनी शरण कांबळेचे अभिनंदन केले आहे .
गावात जल्लोष, फटाक्याची आतषबाजी
शरण कांबळेचे आईवडील मोलमजुरी करतात, मुलगा हुशार असल्यामुळे त्यांनी कष्टाच्या जोरावर मुलाला क्लासवन बनविले. शरण कांबळे उर्तीर्ण झाल्याचे कळताच गावकऱ्यांनाही अत्यानंद झाला, गावात तरुण मित्रांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलालाची उधळणही केली.