रेल्वे रूळ तुटल्याचे दिसताच शेतकºयांने लाल रंगाचे बनियन दाखवून रेल्वे थांबविली
By Appasaheb.patil | Published: December 13, 2019 01:12 PM2019-12-13T13:12:33+5:302019-12-13T13:15:02+5:30
शेतकºयाची तत्परता : तात्पुरत्या रुळाच्या दुरुस्तीनंतर भुसावळ एक्स्प्रेस धावली सुरळीत
सोलापूर : वार मंगळवाऱ़़ दुपारी बारानंतरची वेऴ़़ शेतकरी आपल्या शेतात पाणी देण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होता... अशातच रेल्वे रूळ तुटल्याचे शेतकºयाच्या निर्दशनास आले... अशातच रुळावरून धडधडत येणारी भुसावळ-पुणे एक्स्प्रेस पाहिली... या तुटलेल्या रुळावरून गाडी गेल्यास अनर्थ घडणार हे मनात येताच शेतकºयाने सतर्कता दाखवत स्वत:च्या अंगातील बनियन काढून त्याचा झेंडा बनविला़ त्या बनियनची लाल निशाणी दिसताच रेल्वे चालकांनी प्रसंगावधान राखत गती कमी करीत शेतकºयानजीकच रेल्वे थांबवली अन् काय झाले, याबाबत माहिती घेताच धक्कादायक माहिती समोर आली़ याचवेळी रेल्वे चालकासह प्रवाशांनी हजारो प्रवाशांचे प्राण वाचवून मोठा अनर्थ टाळल्याबद्दल शेतकºयाच्या जिद्दीचे कौतुक केले.
दरम्यान, मंगळवार १० डिसेंबर रोजी मनमाडहून अहमदनगरच्या दिशेने जाणारी भुसावळ-पुणे एक्सप्रेस ही वांबोरीहून अहमदनगरच्या दिशेने जात होती़ यावेळी रेल्वे लाईन ओलांडून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी रामदास बापूराव थोरात (वय ४५, रा़ विळद, ता़ अहमदनगर, जि़ अहमदनगर) हे जात होते़ याचवेळी अचानक किलोमीटर ३६९़०़१ विळद-वांबोरीच्या मध्ये रेल्वे रूळ तुटल्याचे शेतकºयाच्या निदर्शनास आले़ याचवेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी येत असल्याचे शेतकºयाने पाहिले.
प्रसंगावधान दाखवित तत्काळ संबंधित शेतकºयाने आपल्या अंगातील लाल बनियन काढून त्याला झेंडा बनविला अन् रेल्वेला थांबण्याचा इशारा केला़ रेल्वे चालकानेही प्रसंगावधान पाहून हळूहळू रेल्वेची गती कमी करीत रेल्वे थांबवली़ यावेळी रेल्वे चालकाने संबंधित शेतकºयास काय झाले, याबाबतची माहिती विचारली असता शेतकºयाने रेल्वे रूळ कट झाल्याचे सांगितले़ यानंतर लागलीच रेल्वे चालकाने संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली़ त्यानंतर तत्काळ रेल्वे दुरुस्त करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली़ रेल्वे रूळ दुरुस्त झाल्यानंतर गाडी सुरळीतपणे पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
जिवाचीही केली नाही पर्वा...
- हजारो प्रवाशांचे जीव वाचविणारे शेतकरी रामदास बापूराव थोरात़़़ वय ४५ वर्षे़़़ वयाने व तब्येतीने जास्त असलेल्या शेतकºयाने भुसावळ-पुणे रेल्वे थांबविण्यासाठी रेल्वे रुळामधील असलेल्या दगडाचा सामना करीत करीत पळतच साधारण: अर्धा किलोमीटरचे अंतर कापले़ यावेळी त्यांना जास्त पळाल्याने धाप लागत होता, मात्र जिवाची पर्वा न करता शेतकरी रामदास थोरात यांनी प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी जिवाची पर्वा केली नाही़ शेवटी अंगातील लाल बनियन काढून त्याचा झेंडा बनविला अन् रेल्वे थांबविली़ यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले़
शेतकºयाच्या जिद्दीचं होतंय कौतुक...
- प्रसंगावधान पाहून शेतकरी रामदास बापूराव थोरात याने हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले़ या जिद्दी कामगिरीमुळे रेल्वे प्रशासनातर्फे शेतकºयाचा सन्मान करण्यात आला़ यावेळी त्यास रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देण्यात आले़ घडलेला प्रकार सांगताच मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या अंगावर शहारे आले़