सोलापूर/ कुसळंब : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत खामगाव आश्रमशाळेची विद्यार्थिनी प्रिती दत्तात्रय लांडे महिला प्रवर्गातून राज्यात पंधरावा क्रमांक पटकावत यश संपादन केले. त्यामुळे आश्रमशाळेचे संस्थापक प्रभाकर डमरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रिती लांडे हिचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण खामगाव आश्रमशाळेत झाले. पदवीचे शिक्षण लोकमंगल कॉलेजमध्ये झाले. पदवीच्या प्रथम वर्गात शिकत असताना वडील दत्तात्रय लांडे यांचे अकाली निधन झाले अन् वडिलांचे छत्र हरपले. परंतू परिस्थिती समोर हार न मानता आई शोभा लांडे तिच्या शिक्षणाला मदत करीत प्रोत्साहन दिले. मुलगी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निकाल ऐकताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. यावेळी शाळेचे संस्थापक प्रभाकर डमरे यांच्या हस्ते फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन तिचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक सचिन डमरे, डी. एन. कांबळे, जि .यू. उपरे, किरण वाकुरे यांनी तिच्या यशाचे कौतुक केले.