एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 01:50 AM2020-10-11T01:50:39+5:302020-10-11T01:50:47+5:30
१४ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे द्या; अन्यथा जप्तीची कारवाई
सोलापूर : मागील वर्षीच्या ऊसबिलाची संपूर्ण रक्कम दिल्यानंतरच गाळप परवाना देण्यात येईल, या साखर आयुक्तांच्या भूमिकेमुळे एफआरपी न देणाºया कारखान्यांना नोटीस काढण्यात आली आहे. साखर सहसंचालक कार्यालयाकडून गाळप परवान्यासाठी आतापर्यंत १७० प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला सादर झाले असले तरी शुक्रवारपर्यंत राज्यातीत ७५ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत.
राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गाळपासाठी परवाने मागीतले आहेत. साखर सहसंचालक कार्यालयाकडून तपासणी करुन जवळपास १७० कारखान्यांचे अर्ज साखर आयुक्त कार्यालयाला सादर झाले आहेत. यापैकी ७५ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहेत.
१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणाºया साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार आहे. ज्यांनी- ज्यांनी एफआरपी दिली नाही त्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांचे पैसे देण्याची नोटीस काढली आहे. शेतकºयांचे पैसे दिले नाहीत तर आरआरसीची कारवाई केली जाईल. - शेखर गायकवाड, आयुक्त, साखर पुणे