अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस ठाण्याकडे ७२ गावे तर उत्तर पोलीस ठाण्याकडे ५२ असे वर्गवारी करून त्यापद्धतीने कारभार सुरू आहे. ज्या-त्या भागातील नागरिकांना गाव पातळीवरील घटनेची माहिती वेळेत देता यावी. यामुळे पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी मदत होईल, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला एक असे टेलिफोन कार्यरत केले होते. त्याची देखभाल दुरुस्ती आणि बिल भरणे ज्या त्या पोलीस ठाण्याकडून होणे आवश्यक असते. मात्र ते या ठिकाणी झाले नाही. मागील काही दिवसांपासून टेलीफोन बिल भरले गेले नाही. यामुळे टेलिफोन कनेक्शन संबंधित कार्यालयाकडून बंद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
कोट ::::::::::::::
पोलीस ठाण्यात टेलिफोन सतत कार्यरत असणे आवश्यक आहे. यामुळे हद्दीतील कधीही, काहीही, कोणतीही घटना घडल्यास याचा माहिती मिळणे सोयीचे होते. मात्र कशामुळे ते बंद आहे याची माहिती घेऊन ते तत्काळ चालू करण्याचे संबंधितांना सूचना करतो.
- डॉ संतोष गायकवाड,
उपविभागीय पोलीस अधिकारी