डोंगरगाव, गायगव्हाण, पाचेगाव बु., वाकी-घेरडी, मानेगाव या पाच ग्रामपंचायतींसाठी अद्यापही एकही अर्ज दाखल झाला नाही. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी अडीच तासांचा अवधी लागत असल्याने सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज दाखल करता येणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले. २९ रोजी आगलावेवाडी २१, आलेगाव २५, अचकदाणी १८, अजनाळे १३, अकोला ४४, बामणी १, भोपसेवाडी ३, बुद्धेहाळ १७, बुरंगेवाडी ३, चोपडी ६, देवळे १३, धायटी १९, एखतपूर १, गौडवाडी ६, घेरडी ४९, हटकर-मंगेवाडी ११, हलदहिवडी २०, हंगिरगे १६, हणमंतगाव ७, हातीद २६, जुजारपूर १५, जुनोनी ६, कडलास २५, कमलापूर ३, कटफळ १०, खिलारवाडी ४०, किडेबिसरी ६, कोळा १५, लक्ष्मीनगर १२, लोणविरे १०, लोटेवाडी २०, महीम ४, महूद ३१, मांजरी २४, मेडशिंगी ८, मेथवडे १४, नराळे १०, डिकसळ २०, नाझरे १७, निजामपूर १७, पारे ८, राजुरी १३, संगेवाडी ८, शिरभावी ७, सोमेवाडी ७, तरंगेवाडी २९, तिप्पेहाळी ५, उदनवाडी ८, वाणीचिंचाळे ८, वाटंबरे १, वझरे ३, वाकी-शिवणे १३, यलमर-मंगेवडी ५२, इटकी १०, वासूद ४ अशा ५५ ग्रामपंचायतींसाठी ८०० इच्छुकांनी तब्बल ८०५ अर्ज दाखल केले आहेत.
सांगाेला : ८०० जणांचे ८०५ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:30 AM