पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मुंबईच्या भाविकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:56 AM2019-03-09T10:56:07+5:302019-03-09T10:58:06+5:30
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. सूत्राकडून ...
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा सुधाकर येवलेकर (वय ७०), अविनाश सुधाकर येवलेकर, प्रियंका अविनाश येवलेकर (रा. तिघे नाशिक), विजया सोनवणे, सनी सुनील सोनवणे (वय २६, दोघे रा. भिवंडी, मुंबई) हे तीन लहान मुलांसह श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. ते विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी मंदिरात गेले असता रांगेत लहान मुलगा दुसरीकडे गेला म्हणून सनी त्याला पकडण्यासाठी गेला.
या दरम्यान कमांडो भारत दत्तात्रय देवमारे व सनी येवलेकर यांच्यामध्ये वाद झाला. या वादादरम्यान कमांडोने वयोवृद्ध महिलेला धक्काबुकी केली असल्याचे सनी येवलेकर यांनी सांगितले. यानंतर मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, येवलेकर व सोनवणे कुटुंब कमांडो भारत देवमारे यास घेऊन पोलीस ठाण्यात गेले. त्याठिकाणी समन्वयाने हे प्रकरण मिटविण्यात आले.