दिवाळी पाडव्यानिमित्त सुरू होणार विठ्ठलाचे मंदिर; पददर्शनाऐवजी होणार मुखदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 12:16 PM2020-11-15T12:16:52+5:302020-11-15T12:17:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाडव्यानिमित सुरू होणार आहे. मात्र विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शना ऐवजी मुखदर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचा प्रतिबंधक उपाय म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर टाकण्यात येणार आहे. तसेच मंदिर सुरू करण्यापूर्वी मंदिरात स्वच्छ्ता करण्यात येत आहे. भाविक सुरक्षित अंतरामध्ये थांबावेत यासाठी गोल आकरण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर भाविक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी भाविकांना सुरक्षित वेळेने दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अधिक उपायोजना करण्यासाठी मंदिर समितीची बैठक होणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सांगितले.