टेम्पोला कारची धडक, एक कामगार ठार, तिघ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:41 AM2021-03-04T04:41:58+5:302021-03-04T04:41:58+5:30

इतर वाहनांना धोका होईल अशा स्थितीत उभा केलेल्या टेम्पोला वीट भट्टीचे कामगार घेऊन निघालेल्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये ...

Tempola car hit, killing one worker, injuring three | टेम्पोला कारची धडक, एक कामगार ठार, तिघ जखमी

टेम्पोला कारची धडक, एक कामगार ठार, तिघ जखमी

Next

इतर वाहनांना धोका होईल अशा स्थितीत उभा केलेल्या टेम्पोला वीट भट्टीचे कामगार घेऊन निघालेल्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २ मार्च रोजी रात्री ११:४५ वाजता पेनूर शिवारातील माने वस्ती येथे घडली. विठ्ठल राजू जामदार (वय ४०, रा. कुडकी ता. आळंद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेनूर शिवारातील माने वस्तीजवळ टेम्पो एमएच १३ सीयु २००२ च्या चालकाने २ फेब्रुवारी रोजी रात्री मोहोळ ते पंढरपूर रोडवर इतर वाहनातील लोकांच्या जीवितास धोका होईल, अशा परिस्थितीत उभा केला होता. त्यास पाठीमागून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने एमएच ०६/ए झेड २२२८ चा धक्का दिला. यामध्ये कारमध्ये क्लिनर बाजूस बसलेला विठ्ठल राजू जमादार हा गंभीर जखमी होऊन जागीत मयत झाला. तसेच कारमधील चालक भरत व्यंकट जाधव (४५) व त्याचे सोबतचे रोहित दिलीप खताळ (३०, रा. दहिवडी, ता. माण), शरणाप्पा भीमाशंकर जमादार (५०, रा. हिथल शिरूर, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे तिघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची खबर रामचंद्र ईरप्पा कोगनूर (२१) याने पोलिसात दिली. या घटनेचा सहाय्यक पोलीस फौजदार गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: Tempola car hit, killing one worker, injuring three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.