नैसर्गिक ऑक्सिजनमुळे कृत्रिम ऑक्सिजनची गरजच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:24+5:302021-07-30T04:23:24+5:30
चिंचणी (ता. पंढरपूर) येथे दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा, विश्रामगृह, झेडपी शाळा इमारत, रस्ते आदी ...
चिंचणी (ता. पंढरपूर) येथे दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा, विश्रामगृह, झेडपी शाळा इमारत, रस्ते आदी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा माजी मंत्री आ. सुभाष देशमुख व आ. बबनराव शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विठ्ठलचे संचालक समाधान काळे, प्रणव परिचारक, उद्योगपती अजित कंडरे, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे, बाळासाहेब कौलगे, पांडुरंग कौलगे, गटविकास अधिकारी सुरेंद्र रणपिसे, बाळासाहेब काळे, सरपंच मुमताज शेख, उपसरपंच रणजित लामकाने, ॲड. पांडुरंग नाईकनवरे, कुलदीप कौलगे, दत्ता बागल, गणेश बागल, सुग्रीव कोळी, दादा साखरे आदी उपस्थित होते.
पंढरपूर पांडुरंगामुळे जागतिक नकाशावर आहे, ही या तालुक्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्यामुळे दर्शनाला आलेला माणूस या पर्यावरणपूरक गावात भेटून गेला पाहिजे. त्यादृष्टीने त्याचे मार्केटिंग झाले पाहिजे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. या वेळी आ. बबनराव शिंदे यांनी आतापर्यंत तब्बल ७० लाखांचा निधी या गावाला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अनेक योजना मार्गी लागल्या. काही कामे प्रगतिपथावर आहेत, याचे समाधान आहे. येथील वाचनालयासाठी ३ कोटी व ट्रेंनिग सेंटर उभारण्यासाठी डीपीडीसीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आ. बबनराव शिंदे यांनी केली. या वेळी वृक्षमित्र दत्ता बागल यांनी दोनशे सुगंधी झाडे भेट दिली. तर अजित कंडरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट दिल्या. प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले. तर सूत्रसंचालन सावंत यांनी केले.
झाडांचं गाव ते पुस्तकांचं गाव प्रवास
सातारा जिल्ह्यातून कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर विस्थापित झालेलं चिंचणी पंढरपूर तालुक्यातील माळरानावर पुनर्वसित झालं. त्यानंतर या गावातील नागरिकांनी हार न मानता येथे प्रतिमहाबळेश्वर निर्माण करण्याचा चंग बांधला अन् लोकसहभागातून तब्बल सात हजार झाडे लावली, ती जगवली. त्यामुळे ‘झाडांचं गाव’ म्हणून चिंचणी जिल्ह्यात परिचित आहे. आता गावात सुसज्ज वाचनालय उभारून सातारा जिल्ह्यातील भिलारप्रमाणे ‘पुस्तकांचं गाव’ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावकऱ्यांच्या या संकल्पनेला सर्व स्तरातून पाठबळ मिळत आहे. देणगीच्या स्वरूपात शेकडो पुस्तकं मिळत आहेत. आ. बबनराव शिंदे यांनीही यासाठी ३ लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे ‘झाडांचं गाव ते पुस्तकांचं गाव’ अशी वेगळी वाटचाल चिंचणीची सुरू आहे.
फोटो :::::::::::::::::::
चिंचणी येथे विकासकामांचे लोकार्पण करताना आ. सुभाष देशमुख, आ. बबनराव शिंदे, मोहन अनपट, समाधान काळे आदी.