या गाड्या आहेत १२ फेबु्रवारीपर्यंत बंद...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:00 PM2020-01-31T12:00:13+5:302020-01-31T12:02:13+5:30

मध्य रेल्वे : हुबळी विभागात रेल्वेचा ब्लॉक; नॉन इंटरलॉकिंगचे होणार काम

These trains are closed till 9th February ...! | या गाड्या आहेत १२ फेबु्रवारीपर्यंत बंद...!

या गाड्या आहेत १२ फेबु्रवारीपर्यंत बंद...!

Next
ठळक मुद्देगाडी क्रमांक १११४० गदग-मुंबई एक्स्प्रेस बागलकोटहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेलगाडी क्रमांक ७१३०३ सोलापूर-गदग डेमू हुबळीपर्यंत धावणार आहेगाडी क्रमांक ७१३०४ गदग-सोलापूर डेमू हुबळीहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार

सोलापूर : दक्षिण पश्चिम रेल्वेमधील हुबळी विभागातील गदग आणि होसपेट सेक्शन दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी सोलापूर विभागातून धावणाºया सहा रेल्वे गाड्या ९ ते १२ फेबु्रवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत़ याशिवाय चार गाड्यांच्या मार्गात व वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेमधील असलेल्या हुबळी विभागातील गदग आणि होसपेट सेक्शनमधील बिनकादट्टी-गदग-कंगीन्हल-हरलापूर येथे नॉन इंटरलॉकिंग (दुहेरीकरणाचे) काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे गाडी क्रमांक १११३९ मुंबई-गदग-एक्स्प्रेस बागलकोटपर्यंत धावणार असून ही गाडी बागलकोट -गदग स्थानकादरम्यान धावणार नाही. गाडी क्रमांक १११४० गदग-मुंबई एक्स्प्रेस बागलकोटहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल.

ही गाडी गदग-बागलकोट स्थानकादरम्यान धावणार नाही़ गाडी क्रमांक ७१३०३ सोलापूर-गदग डेमू हुबळीपर्यंत धावणार आहे़ हुबळी-गदग स्थानकादरम्यान ही गाडी धावणार नाही़ गाडी क्रमांक ७१३०४ गदग-सोलापूर डेमू हुबळीहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार आहे़ याशिवाय म्हैसूर-सोलापूर, सोलापूर-म्हैसूर, यशवंतपूर- बिकानेर, यशवंतपूर -बाडमेर, बिकानेर-यशवंतपूर या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे़ तरी प्रवाशांनी गाड्यांच्या मार्गात झालेला बदल व वेळापत्रकातील बदल पाहूनच प्रवास करावा असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.

रद्द झालेल्या गाड्या...

  • - गाडी क्रमांक १७३१९ हुबळी-सिकंदराबाद एक्स्प्रेस
  • - १७३२० सिकंदराबाद-हुबळी एक्स्प्रेस
  • - गाडी क्रमांक ५६९०३ धारवाड - सोलापूर पॅसेंजर
  • - गाडी क्रमांक ५६९०५ सोलापूर-हुबळी पॅसेंजर
  • - गाडी क्रमांक ५६९०६ हुबळी-सोलापूर पॅसेंजर 

Web Title: These trains are closed till 9th February ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.