याबाबत संतोष महादेव फरड (वय २०, रा. पडसाळी ता. माढा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, त्यावरून अज्ञात चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार फिर्यादी व त्याचा चुलत भाऊ वैभव फरड हे म्हैस घेण्यासाठी आपल्या गावाहून मोटारसायकलवरून म्हैसगावकडे चालले होते. त्या वेळी फिर्यादीने कुर्डूवाडी येथील एका पेट्रोल पंपासमोरील चायनीजच्या गाड्यासमोर चुलत भाऊ वैभवकडील २० हजार रुपये आपल्याकडे घेतले व पुढे जाऊ लागले. या वेळी पुढच्या एका हॉटेलसमोर लघुशंकेला थांबले. यादरम्यान पाठीमागून मोटारसायकलवरून दोघे आले. त्यातील एकाने हातातील काठीने मारहाण केली. तोपर्यंत लगेच दुसऱ्या एका दुचाकी गाडीवरून एक महिला व एक व्यक्ती तिथे आली. त्यांनी फिर्यादी व त्याच्या चुलत भावाला जवळचा कोयता दाखवून २७ हजार ४०० रुपये काढून घेतले. संतोष फरड यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.