सोलापूर : आंध्र प्रदेशातील यम्मारपल्ली पोलीस ठाणे (जि.तिरुपती) हद्दीत येथे घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली असून, दोघांना आंध्र प्रदेशपोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नागराजू सत्यनारायण जक्कमशेट्टी (वय ३३ रा. पेदवारुगद्द, पेनुमंड्रा जि. पश्चिम गोदावरी राज्य- आंध्र प्रदेश), भोला भिमाराव नागसाई (वय-३० वर्षे रा.सिन्नागिरी कॉलनी, गाजावाका जि. विझाग विशाखापट्टणम राज्य आंध्र प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांना पकडण्यासाठी आंध्र प्रदेशचे पोलीस गेल्या काही महिन्यापासून प्रयत्न करत होते. दोघे सोलापूर येथे येत जात असल्याची माहिती तिरुपती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ते गेल्या एक महिन्यापासून पकडण्याचा प्रयत्न करीत होते. आंध्र प्रदेश पोलिसांनी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे येथून नमूद आरोपीतांना पकडण्याकरिता मदत मागितली होती. सोमवारी तिरुपती क्राईम बॅच अधिकारी, कर्मचारी व विजापूर नाका पोलीस ठाणेकडील डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सोरेगांच येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना पकडले. दोघांनी आजपर्यंत ४० गुन्हे केल्याचे कबूल करुन एकूण १ किलो ६०० ग्रॅम सोने, ५ किलो १०० ग्रॅम चांदी, ३ लाख ४ हजार रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप-आयुक्त वैशाली कडुकर, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, डी.बी.पथकातील सहायक फौजदार संजय मोरे, हवालदार श्रीरंग खांडेकर, राजकुमार तोळनुरे, शावरसिध्द नरोटे, प्रकाश निकम, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार, आलम बिराजदार, बालाजी जाधव, उदयसिंह साळुके, विशाल बोराडे, लक्ष्मण वसेकर, अनिल गवसाने, अतिश पाटील, शिवानंद भिमदे व तिरुपती क्राईमचे पोलीस निरीक्षक मोहनप्रसाद, रवी प्रकाश, नागराज, विनायक, राजकुमार, नागराज वर्गरे यांनी पार पाडली.