सोलापूर : आषाढ कृ. ११ कामिका एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले.
दरम्यान, आषाढ कृ. ११ कामिका एकादशी निमित्त श्री श्रीकांत शिवाजी गणगले (बार्शी जि. सोलापूर) यांच्या वतीने आरास करण्यात आली. यात झेंडू, मोगरा, कामिनी, ब्लू डी.जे, टॅटीस, शेवंती, गुलछडी, गुलाब आदी १५ फुलांचे प्रकार व पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली. : साधारणतः १ टन फुले वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले.