आजपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडणार, मुंबईत बैठक : बबनराव शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:12 PM2018-01-11T17:12:11+5:302018-01-11T17:14:24+5:30

शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

From today, leaving water from canal for agriculture, meeting in Mumbai: Babanrao Shinde's information | आजपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडणार, मुंबईत बैठक : बबनराव शिंदे यांची माहिती

आजपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडणार, मुंबईत बैठक : बबनराव शिंदे यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्दे उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेशरब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेसोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
टेंभुर्णी दि ११ : शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 
आ. शिंदे म्हणाले, २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झालेला असल्यामुळे आॅक्टोंबर महिन्यात उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा झाला होता. सर्वत्र पाण्याची मुबलकता असल्यामुळे चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले होते. सध्या उजनी धरणात १०४ टक्के पाणीसाठा असून, उजनीच्या मुख्य कालवा २० किमी, उजवा कालवा ११९ किमी व डावा कालवा १२६ कि.मी.पर्यंतच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली होती. या आवर्तनाची १५ डिसेंबर २०१७ पासूनच शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.
मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवार, दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले.   बबनराव शिंदे यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.  सीना-माढा उपसा सिंचन सुरू करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. या योजनेचे थकीत वीज बिल भरल्याशिवाय योजना सुरू करता येणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 
सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे २ कोटी ६ लाख रुपये वीज बिल थकीत असून, शासनाने ४८ लाख ५६ हजार रुपयांचा एक हप्ता भरल्याशिवाय योजना चालू करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे योजना सुरू राहण्याच्या दृष्टीने योजनेवरील लाभधारक शेतकºयांनी वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करावे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.
बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, जलसंपदाचे प्रमुख अधिकारी रजपूत, सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, उपजिल्हाधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.
-----------------------
सोलापूर, पंढरपूरचाही निर्णय
- सोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचेही आदेश महाजन यांनी दिले.

Web Title: From today, leaving water from canal for agriculture, meeting in Mumbai: Babanrao Shinde's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.