गत निवडणुकांमध्ये दोघांना पडलेल्या मतांची बेरीज विजयी उमेदवाराहून अधिक : आवताडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:54+5:302021-03-31T04:22:54+5:30

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आवताडे यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली. याप्रसंगी भाजपचे माजी मंत्री ...

The total number of votes cast for both in the last election is more than the winning candidate: Avtade | गत निवडणुकांमध्ये दोघांना पडलेल्या मतांची बेरीज विजयी उमेदवाराहून अधिक : आवताडे

गत निवडणुकांमध्ये दोघांना पडलेल्या मतांची बेरीज विजयी उमेदवाराहून अधिक : आवताडे

Next

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आवताडे यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली. याप्रसंगी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळामध्ये गेल्या दीड वर्षात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचा विकास खुंटला आहे. आपण इंजिनिअर आहोत त्यामुळे मतदारसंघाचा पायाभूत विकास कसा करायचा, याची जाणीव आपल्याला आहे. मतदारसंघाच्या विकासासाठीच उमेदवारी भाजपकडून दाखल केली आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे ही निवडणूक विजयाच्या दृष्टीने अत्यंत सोपी असल्याचे देखील आवताडे यांनी सांगितले.

फोटो लाईन ::::::::::::::::::::::::::::::

निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक.

Web Title: The total number of votes cast for both in the last election is more than the winning candidate: Avtade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.