कोविड सेंटरमधील रुग्णांवर वेळेत उपचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:57+5:302021-05-06T04:22:57+5:30
मोहोळ येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित तातडीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी नजीक पिंपरी, फाटे मंगल कार्यालय, ...
मोहोळ येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित तातडीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी नजीक पिंपरी, फाटे मंगल कार्यालय, घाटुळे मंगल कार्यालयासह अन्य हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरचा आढावा घेतला. शहरात नव्याने सुरू केलेल्या १०० बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा द्या, अशा सूचनाही केल्या.
या वेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, नायब तहसीलदार लीना खरात, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, गटविकास अधिकारी गणेश मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रल्हाद गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर, डॉ. बालाजी गवाड, डॉ. सत्यजित मस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, अण्णा फडतरे, जयवंत गुंड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
-----
०४मोहोळ बैठक
मोहोळ येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना आ. यशवंत माने.
-----