अकलूज येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १५ दिवस झाले तरी सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी येथील नवनाथ चव्हाण, संजय चव्हाण, संतोष भोसले, मारुती केंगार, सदाशिव आरडे, विकास चव्हाण, दादा चव्हाण, दत्तात्रय लोखंडे, आनंद केंगार, शिवाजी चव्हाण, जगन्नाथ खंडागळे, अशोक लांडगे या हलगी वादकांनी हलग्यांचा कडकडाट करत हलगीनाद आंदोलन केले.
आजच्या साखळी उपोषणात अकलूजचे माजी उपसरपंच धनंजय देशमुख, सदस्य संजय साठे, गणेश वसेकर, माजी सरपंच दादासाहेब मोरे, माजी पं.स. सदस्य नारायण फुले, नवनाथ गायकवाड, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ माने, उपाध्यक्ष कादर शेख, विक्रम माने, तनवीर तांबोळी, तुषार माने, गणेश जामदार, मिलिंद गायकवाड, बंडू भालेराव, अतुल बोबडे, शकुर तांबोळी, केदार लोहकरे, राजेंद्र सुरवसे आदी सहभागी झाले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), माळशिरस तालुका व अकलूज शहर फोटोग्राफर संघटना, शंकरराव मोहिते-पाटील लाकूड व्यापारी संघ, अकलूज शहर बुरुड समाजाच्या वतीने पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी बुरुड समाजाच्या वतीने सूप व दुरडी देऊन शासनाचा निषेध करण्यात आला.