भरदिवसा अडीच लाखाचे सोन्याचे बिस्कीट पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:05+5:302021-03-17T04:23:05+5:30
करमाळा : भरदिवसा चोरट्यांनी करमाळा शहरात घर फोडून सोन्याच्या बिस्किटासह २ लाख ४६ हजार ९०० रूपयाचा ऐवज चोरट्यांनी पळवून ...
करमाळा : भरदिवसा चोरट्यांनी करमाळा शहरात घर फोडून सोन्याच्या बिस्किटासह २ लाख ४६ हजार ९०० रूपयाचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला आहे. या घटनेने करमाळ्यात मुथानगर परिसरात घबराट पसरली आहे.
१५ मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी मयूर संजयकुमार सुंदेचामुथा (रा. मुथानगर, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार १५ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मयूर दुकानात गेले होते. वडील संजयकुमार हे बांधकामाकडे गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा, कुलूप तोडून घरात शिरले. रोख दहा हजार व २ लाख ३६ हजार ९०० रूपयांचे ५० ग्रॅम सोन्याचे बिस्कीट असा २ लाख ४६ हजार ९०० रूपयाचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.