सोलापूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोलापुरात आता ३४३ इतके 'कोरोना' बाधित रुग्ण झाले असून आत्तापर्यंत २४ जणांचा 'कोरोना'मुळे मृत्यू झाला आहे. आज दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आत्तापर्यंत कोरोना स्वॅब ३८३३ जणांची घेण्यात आली. यापैकी ३५३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात ३२४३ निगेटिव्ह तर ३४३ पॉझिटिव्ह आहेत तर अद्याप २४७ अहवाल प्रलंबित आहेत.
आज एका दिवसात १०५ अहवाल प्राप्त झाले यापैकी ९२ निगेटिव्ह तर १३ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात ८ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर आज ७ जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं.
आत्तापर्यंत ३४३ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये १८८ पुरूष तर १५५ महिला आहेत तर मृत २४ मध्ये १३ पुरूष आणि ११ महिलांचा समावेश आहे. रूग्णालयातून आत्तापर्यंत ११३ जणांना बरं झाल्यानं घरी पाठविण्यात आलं आहे तर रूग्णालयात दाखल असणार्यांची संख्या २०६ इतकी आहे.
आज मृत पावलेली व्यक्ती ६३ वर्षीय पुरूष असून नाथसंकुल सिव्हील हॉस्पिटलजवळ येथील रहिवासी आहे. त्यांना १० मे रोजी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा १५ रोजी मृत्यू झाला तर दुसरी व्यक्ती शास्त्रीनगर महादेव चौक येथील रहिवासी ५८ वर्षीय पुरूष आहे. १२ मे रोजी त्यांना दाखल करण्यात आलं होतं आज सकाळी ते मृत पावले.