पंढरपूर तालुक्यात वाळुचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त
By काशिनाथ वाघमारे | Published: January 12, 2024 05:55 PM2024-01-12T17:55:53+5:302024-01-12T17:56:00+5:30
अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
सोलापूर : अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चिंचोली भोसे व इसबावीत जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
भीमा नदीपात्रातील चिंचोली भोसे (खरात वस्ती) व पंढरपूर हद्दीतील कंडरे तालमीच्या पाठीमागे अवैध वाळू व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली. सदरच्या दोन्ही कारवाया महसूल पथकाने पहाटे ३ ते ५ वाजताच्या दरम्यान केल्या. या पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, तलाठी प्रशांत शिंदे, प्रमोद खंडागळे व पंढरपूर मंडळातील सर्व कोतवाल सहभागी झाले होते.