अरण गावात दोन अनोखे विवाह; काय झाले लग्नावेळी विशेष ते पहा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:19 PM2019-04-25T14:19:50+5:302019-04-25T14:28:11+5:30
अरणगावातील दोन अनोख्या विवाहांची कहाणी; पाणी, श्रमदान व काटकसर यांचा अनोखा संगम, नवपरिणितांनी केला गाव स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प
कारी : सचिन व प्रियांका झोडगे व दिनेश व नम्रता काजळे या दोघांचा विवाह अरणगाव या गावासाठी आठवणीत राहील, असा ठरला.
२३ रोजी या दोघांचे लग्न ठरले होते.
ना डामडौल, ना ढोल ! ‘तुफान आलंया’ या स्वरांनी निनादलेली ही मिरवणूक श्रमदानासाठी दाखल होताच तुफान आल्याची जाणीव सर्व श्रमकर्त्यांना झाली. दोन्ही नवविवाहित जोडप्यांनी श्रमदान करून सर्व गावकºयांचा उत्साह वाढवला. पाणी फाउंडेशनच्या विविध ११ उपसमित्यांच्या माध्यमातून नियोजन आखले जाते. लग्नाचा अथवा जन्माचा वाढदिवस असणारे श्रमदान करणाºयांना अल्पोपहार देतात. गावात तसा फलकच लावला आहे. या उपक्रमातून देणगीसोबतच नवविवाहित वधू व वरांच्या माता-पित्यांनी श्रमदान व पाणी फाउंडेशनसाठी वीस हजार रुपयांची देणगी देऊन कार्याला हातभर लावला आहे.
बार्शी तालुक्यातील अरणगाव हे शहराजवळचे गाव. परंतु रोजगार निर्मितीसाठी सतत शहराशी संलग्न. भौगोलिकदृष्ट्या ना मोठी नदी, ना तलाव. परिणामी कोरडवाहू शेतीचे प्रमाण ९८ टक्के आहे.
गावची अर्थव्यवस्था शेतीवर असल्यामुळे गावकºयांनी एकत्र येऊन पाणी फउंडेशनच्या वॉटर कपमध्ये सहभाग नोंदणी केली. कामाची सुरुवात केली. रोज २५० लोक श्रमदानाससाठी असतात. बचत गटांचे विशेष सहकार्य, मुले, महिलांचाही सहभाग वाढला आहे. श्रमदानातून तीन हजार घनमीटर काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत खोदाईमध्ये झालेल्या कामातून तीन कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे.
नवरदेव ठरले ‘वॉटर हिरो’
- - या दोन्ही नवरदेवांच्या श्रमदानानंतर हळदीचा व विवाह समारंभ पार पडला. दोन ‘वॉटर हिरो’ संकल्पना पुढे आली आहे. अशा अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.
- च् या दोन्ही नवविवाहित जोडप्यांनी गाव पाणीदार करण्यासोबच काटकसरीने पाणी वापर करून गाव स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.