उजनीची वाटचाल ८० टक्क्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:59+5:302021-09-16T04:28:59+5:30

भीमानगर : पुणे जिल्ह्यातील १९ पैकी दहा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनीची टक्केवारी वेगाने वाढत आहे. चालूवर्षी मायनस २३ ...

Ujani's journey to 80 percent | उजनीची वाटचाल ८० टक्क्यांकडे

उजनीची वाटचाल ८० टक्क्यांकडे

Next

भीमानगर : पुणे जिल्ह्यातील १९ पैकी दहा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनीची टक्केवारी वेगाने वाढत आहे. चालूवर्षी मायनस २३ वरची टक्केवारी असताना उजनीत ७८ टक्के पाणीसाठा आला आहे. आतापर्यंत चालू हंगामात उजनीत १०१ टक्के पाणी आले आहे.

उजनी लवकरच ८० टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अजूनही बंडगार्डन मधून १४००० क्युसेक, दौंडमधून १५५९७ क्युसेक विसर्ग उजनीत येतोय;मात्र सोमवार व मंगळवारच्या तुलनेत तो कमी झाला आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात उजनीत पाणीसाठा १११ टक्के होता. या वर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी धरणात पाणीसाठा ७८ टक्के एवढा आहे. अजूनही धरणात पाणी येत असल्याने टक्केवारी लवकरच ९० टक्के ओलांडेल.

---

उजनीची सद्यस्थिती...

एकूण पाणीपातळी ४९६.७५० मीटर

एकूण पाणीसाठा २९७३.७८ दलघमी

१०५.२० टीएमसी

उपयुक्त पाणीसाठा

११७०.९७ दलघमी, ४१.५० टीएमसी,

टक्केवारी ७८ टक्के

उजनीतून जाणारा विसर्ग

बोगदा १५०

सीना-माढा २२२

दहिगाव ८४

-----

उजनीत येणारा विसर्ग...

बंडगार्डन १४०००

दौंड १५५९७

Web Title: Ujani's journey to 80 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.