भीमानगर : पुणे जिल्ह्यातील १९ पैकी दहा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनीची टक्केवारी वेगाने वाढत आहे. चालूवर्षी मायनस २३ वरची टक्केवारी असताना उजनीत ७८ टक्के पाणीसाठा आला आहे. आतापर्यंत चालू हंगामात उजनीत १०१ टक्के पाणी आले आहे.
उजनी लवकरच ८० टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अजूनही बंडगार्डन मधून १४००० क्युसेक, दौंडमधून १५५९७ क्युसेक विसर्ग उजनीत येतोय;मात्र सोमवार व मंगळवारच्या तुलनेत तो कमी झाला आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात उजनीत पाणीसाठा १११ टक्के होता. या वर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी धरणात पाणीसाठा ७८ टक्के एवढा आहे. अजूनही धरणात पाणी येत असल्याने टक्केवारी लवकरच ९० टक्के ओलांडेल.
---
उजनीची सद्यस्थिती...
एकूण पाणीपातळी ४९६.७५० मीटर
एकूण पाणीसाठा २९७३.७८ दलघमी
१०५.२० टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
११७०.९७ दलघमी, ४१.५० टीएमसी,
टक्केवारी ७८ टक्के
उजनीतून जाणारा विसर्ग
बोगदा १५०
सीना-माढा २२२
दहिगाव ८४
-----
उजनीत येणारा विसर्ग...
बंडगार्डन १४०००
दौंड १५५९७