भाचीचा बालविवाह केल्याप्रकरणी मामानेच केली मुलीच्या आई वडिलाविरुध्द तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 09:48 PM2021-01-07T21:48:33+5:302021-01-07T21:49:17+5:30

पंढरपूर : बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

The uncle lodged a complaint against the girl's parents for marrying her niece | भाचीचा बालविवाह केल्याप्रकरणी मामानेच केली मुलीच्या आई वडिलाविरुध्द तक्रार

भाचीचा बालविवाह केल्याप्रकरणी मामानेच केली मुलीच्या आई वडिलाविरुध्द तक्रार

Next

पंढरपूर : भाचीचा बालविवाह केल्याप्रकरणी मामानेच मुलीचे आई, वडील, नवरा व इतर पाहुण्यांविरुध्द  गुरुवारी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  औंढी (ता. मोहोळ) येथील एकाच्या घरी  त्यांची अल्पवयीन भाची राहण्यास होती. त्या मामाच्या घरी त्याच्या भाचीचे आई - वडील आले. मुलीला तारापूर (ता. पंढरपूर) येथे २ दिवस घेऊन जातो म्हणून घेऊन गेले. यानंतर त्या अल्पवयीन मुलीने घरातील माझे लग्न लावून देत असल्याचा फोन मामाला केला. यानंतर मामा मुलीच्या घरी गेला असता मुलीच्या आई - वडिलांनी मुलीचे लग्न लावून दिले असल्याचे सांगितले. यामुळे मामाने मुलीचे आई-वडील, नवरा मुलगा व त्याच्या घरातील लोकांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

यामुळे मुलीचे आई वडील, नवरा व अनंता महादेव शेळके, पद्मिनी अनंता शेळके, प्रणव नागनाथ सपाटे, सुलभा नागनाथ सपाटे, सिंधू चंद्रकांत शेळके, चंद्रकांत नरहरी शेळके यांच्याविरुध्द बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती किरण अवचर यांनी दिली.


माझे बळजबरीने लग्न लावून देत आहेत

घरातील लोक मामा माझे बळजबरीने लग्न लावून देत आहेत तुम्ही मला न्यायला या  असे बाल विवाह झालेल्या अल्पवयीन मुलीने मामीच्या मोबाईल वर मामला बोलली आहे. याबाबतची व्हॉइस क्लिप मामाने पोलीसांनी सुनावली आहे.

Web Title: The uncle lodged a complaint against the girl's parents for marrying her niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.