मोदींच्या नेतृत्वाखाली देश मृतावस्थेकडे जातोय; सुशीलकुमार शिंदेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:49 PM2020-10-10T13:49:40+5:302020-10-10T15:50:52+5:30

''सध्या देशात गरीब माणसांना जगणे अडचणीचे होत आहे.  तरुणांना वाव राहिला नाहीे. अर्थिक परिस्थिती बिघडली आहे. सामाजिक विचार खाली गेला आहे.''

Under Modi's leadership, the country is dying; Sushilkumar Shinde criticizes Modi | मोदींच्या नेतृत्वाखाली देश मृतावस्थेकडे जातोय; सुशीलकुमार शिंदेंची टीका

मोदींच्या नेतृत्वाखाली देश मृतावस्थेकडे जातोय; सुशीलकुमार शिंदेंची टीका

Next

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मृतावस्थेकडे जात असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

पंढरपूर येथील माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, पुरागामी विचारांचे ह.भ.प. रामदास महाराज जाधव, हिंदुत्ववादी ह.भ.प. वा.ना. उत्पात यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे पंढरपुरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे शिंदे म्हणाले, सध्या देशात गरीब माणसांना जगणे अडचणीचे होत आहे.  तरुणांना वाव राहिला नाहीे. अर्थिक परिस्थिती बिघडली आहे. सामाजिक विचार खाली गेला आहे.

बहुजन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही कारवाई करताना विरोध केला जात होता. सध्या हाथरस सारख्या अनेक घटना घडत आहेत. मात्र कारवाई होताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बेबंदशाही निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे सांगून थेट मोदीवर टीकास्त्र शिंदे यांनी सोडले आहे.

Web Title: Under Modi's leadership, the country is dying; Sushilkumar Shinde criticizes Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.