भाळवणी येथील रोड लाइट केली पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:31+5:302021-07-30T04:23:31+5:30

येथील वीज वितरणकडून ग्रामपंचायत पाणीपुरवठा व रोड लाइटची अवास्तव वीज बिल आकारणी केली होती. यापूर्वी रोड लाइटचे वीज बिल ...

Undo the road light at Bhalwani | भाळवणी येथील रोड लाइट केली पूर्ववत

भाळवणी येथील रोड लाइट केली पूर्ववत

Next

येथील वीज वितरणकडून ग्रामपंचायत पाणीपुरवठा व रोड लाइटची अवास्तव वीज बिल आकारणी केली होती. यापूर्वी रोड लाइटचे वीज बिल राज्य शासनातर्फे पंचायत समिती स्तरावर भरले जात होते; परंतु गेल्या महिन्यामध्ये वीज वितरण विभागाने भाळवणी ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपयांची वीज बिले दिली होती. यापैकी पाणीपुरवठ्याची वीज बिले भरून वीज पूर्ववत केली; पण रोड लाइटची वीज बिले ही राज्य शासनानेच भरावीत, असा सूर सर्वच ग्रामपंचायतींनी आळवत ही बिले भरण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत व सरपंच परिषद संघटनांच्या बैठकीनंतर ग्रामपंचायतीचे तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडावे, असा आदेश पारित केला होता.

या आदेशानंतरही स्थानिक वीज वितरणकडून लेखी आदेश आम्हाला प्राप्त झाला नसल्याचे सांगून वीज कनेक्शन जोडण्यास टाळाटाळ करीत होते.

त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यामार्फत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून रोड लाइट कनेक्शन तात्काळ जोडण्यास कार्यकारी अभियंता विजय गवळी यांना आदेश द्यावेत, असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच कार्यकारी अभियंत्यांनी भाळवणी येथील रोड लाइट सुरू करून दिली. यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे माजी संचालक दीपक गवळी, ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे उपस्थित होते.

फोटो :::::::::::::::::::

भाळवणी येथील रोड लाइट पूर्ववत करण्यात आली. यावेळी दीपक गवळी, नितीन शिंदे व वीज वितरणचे कर्मचारी.

Web Title: Undo the road light at Bhalwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.