उत्तर सोलापूर तालुक्यातील ५४ महसुली गावांसाठी पाच मंडल, तर तलाठी सजांची संख्याही २५ इतकी होती. मात्र, लोकसंख्या, सातबारा उतारे संख्या लक्षात घेऊन मंडळाची व सजांची संख्या वाढविण्यात आली आहे. उत्तर तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत कसबे सोलापूर, शेळगी, तिर्हे, वडाळा व मार्डी ही मंडल व २५ सजे होते. नव्याने मजरेवाडी, बाळे, कोंडी व सोरेगाव ही नव्याने मंडलांची निर्माण केली आहे.
---
- कसबे सोलापूर या जुन्या मंडळात कसबे सोलापूर- १, २, ३, ४, ५ हे व सलगरवाडी या सजांचा समावेश आहे.
- नव्याने निर्माण केलेल्या मजरेवाडी मंडलात मजरेवाडी- १, २, ३, ४, ५ व कुमठे हे सजे सामावले आहेत.
- बाळे या नवीन मंडलात बाळे- १ व २, खेड, भोगाव व गुळवंची हे सजे आहेत.
- कोंडी या नवीन निर्माण केलेल्या मंडलात कोंडी-१ व २, केगाव (शिवाजीनगर), पाकणी (शिवणी), बीबीदारफळ या गावांचा (सजा) समावेश आहे.
- शेळगी मंडलात शेळगी-१, शेळगी- २, दहिटणे हे स्वतंत्र, तर हगलूर ( तळेहिप्परगा, एकरुख), होनसळ (राळेरास व तरटगाव) हे सजे राहतील.
- सोरेगाव या नवीन मंडलात सोरेगाव, प्रतापनगर (समशापूर), नेहरुनगर - १ व २, नंदूर (भाटेवाडी)
- तिऱ्हे मंडलात तिऱ्हे पाथरी, हिरज, कवठे ( बेलाटी), डोणगाव (तेलगाव), देगाव (बसवेश्वर नगर)
- मार्डी मंडलात मार्डी, नरोटेवाडी (सेवालालनगर), बाणेगाव, कारंबा, अकोलेकाटी व नान्नज हे सजे.
- वडाळा मंडलात वडाळा (इंचगाव), गावडीदारफळ, रानमसले, कळमण ( साखरेवाडी), कौठाळी (भागाईवाडी), पडसाळी (वांगी)
- मार्डी मंडलातील बीबीदारफळ गाव कोंडी मंडलात, तर वडाळा मंडलातील नान्नजचा समावेश मार्डी मंडलात करण्यात आला आहे.