सोलापूर जिल्ह्यातील ३४७ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:47 PM2021-03-04T12:47:08+5:302021-03-04T12:47:13+5:30

नळजोडणी वेगात : दोन महिन्यांत निम्म्या इमारतींमध्ये दिले कनेक्शन

Water crisis in 347 Anganwadas in Solapur district at the beginning of summer | सोलापूर जिल्ह्यातील ३४७ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट

सोलापूर जिल्ह्यातील ३४७ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट

Next

सोलापूर : जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागला असून, पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३४७ अंगणवाड्यांमध्ये अद्याप पाण्याची सोय करण्यात आली नसल्यामुळे अंगणवाडीताईंवर जलसंकट ओढवणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाड्या चालविल्या जातात. कोरोना महामारीमुळे गेल्या मार्चपासून अंगणवाड्या बंद असल्या तरी कामकाजासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना दररोज हजेरी लावावीच लागत आहे. आहार, लसीकरण, मुलांचे आरोग्य, घरबसल्या अभ्यास या गोष्टींसाठी अंगणवाडी सेविकांना काम करावेच लागत आहे. ऑक्टोबरपर्यंत पन्नास टक्के अंगणवाड्यांत पाण्याची सोय नव्हती. यादरम्यान शासनाने शंभर दिवसांत अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्याचा आदेश दिला.

ग्रामविकास विभागाने प्रत्येक अंगणवाडीला नळ कनेक्शन व स्वच्छतागृह बंधनकारक केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच या प्रश्नात लक्ष घातले. वेळोवेळी बैठका घेऊन जलजीवन मिशन मोहिमेला गती दिली. जिल्ह्यातील निम्म्या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. बऱ्याच अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळेत, ग्रामपंचायतीत आणि समाजमंदिरात भरत आहेत. अडचण नसलेल्या ९२ टक्के अंगणवाड्यांना फेब्रुवारीअखेर नळ कनेक्शन दिल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगितले.

अंगणवाड्यांत पाण्याची सोय केली जाणार

मार्चअखेर उर्वरित सर्व अंगणवाड्यांत पाण्याची सोय केली जाणार आहे. ४७ गावांत पाणीपुरवठा योजना नाही. ही गावे अत्यंत कमी लोकवस्तीची, वाड्यावस्तींवरील आहेत. ज्या गावात पाणीपुरवठ्याची अडचण आहे तेथे बोअर, सार्वजनिक विहिरीवरून पाण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या अंगणवाडीत बालके येत नसली तरी भविष्यात पाण्याची सोय होणे गरजेचे आहे. पिण्याच्या स्वच्छ पाण्याबराेबर हात धुणे व स्वच्छतागृहासाठी पाण्याची सोय करणे महत्त्वाचे ठरणार आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व अंगणवाड्यांना पाणीपुरवठा करण्याचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे.

  • एकूण अंगणवाड्या - ४,२११
  • नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या - ३४७

तालुकानिहाय आढावा 

  • तालुका नळजोडण्या नसलेल्या अंगणवाड्या
  • अक्कलकोट ३६७ - ००३
  • बार्शी            ३२३ -             ००५
  • करमाळा ३७१ -             ००१
  • माढा            २१८ -             ००८
  • माळशिरस ६७५ -             ०१९
  • मंगळवेढा २६३ - ००३
  • मोहोळ ४२७ - ०२५
  • पंढरपूर ४६३ -             ००३
  • सांगोला ३९५ - ००५
  • उ. सोलापूर १७४ -             ०२६
  • द. सोलापूर २९४ - ००३

Web Title: Water crisis in 347 Anganwadas in Solapur district at the beginning of summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.