आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लकविजयपूर : जिल्ह्यातील आलमट्टी धरण कृष्णा नदीवरील १२३ टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या व मागील वर्षाच्या पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या जलाशयात सध्या केवळ १७ टीएमसी इतकाच मृतवत पाण्याचा साठा असल्याने यावर्षी बागलकोट, विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यांना अभूतपूर्व अशा तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन विजयपूर पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.आलमट्टी जलाशयाची उंची ५०६ मीटर इतकी आहे. वास्तविक पाहता आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मे महिन्यामध्ये मृतवत साठ्यापर्यंत जातो. पावसाचा अभाव, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, जमिनीत मुरणारे पाणी, विविध प्रकारच्या पिकासाठी जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याचा वापर व आलमट्टी जलशयातून शेजारच्या राज्यात सोडण्यात आलेले पाणी आदी कारणामुळे आलमट्टी जलाशयातील पाणीसाठा मार्चच्या पंधरवड्यात मृतवत अवस्थेत गेलेला आहे. सध्या आलमट्टी जलाशयात केवळ १७ टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी परेसा आहे. परंतु, जलसिंचनासाठी आता पाणी सोडता येणार नसल्याचे कृष्णाभाग्य जलनियम लि. च्या एका अभियंत्याने सांगितले. आलमट्टीजलाशयांमध्ये जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा आहे. मात्र भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचे गणित कोलमडत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.----------------------------------------------- विजयपुरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीविजयपुर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. सध्या काही भागात पाच दिवसाआड आणि काही भागात सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे विजयपुर शहरवासियांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हेस्कॉमकडून भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात येत असल्याने खोदाई करताना जलवाहिन्यांची मोडतोड होत आहे. विजयपुर शहरातील प्रत्येक रस्त्यावर गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र काही भागात पंधरा ते वीस दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. फुटलेल्या जलवाहिनीद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
आलमट्टी धरणातील पाण्यात घट, केवळ १७ टक्के पाणी शिल्लक
By admin | Published: March 16, 2017 6:30 PM