सोलापूर : शहर व जिल्ह्यातील काही दुकाने व इतर शोरुम्स लवकरच सुरू होणार असल्याने व्यापाºयांची, उद्योजकांची धावपळ सुरू झाली आहे. विशेष करून सोलापुरातील कपड्यांच्या दुकानात तसेच इलेक्ट्रॉनिक्स शोरुम्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. आपल्या शोरुममध्ये येणाºया ग्राहकांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच काही दुकानासमोर सॅनिटाईज टनेल उभारला आहे. कोरोनापासून ग्राहकांचा बचाव करण्यासाठी दुकानदार सर्वतोपरी काळजी घेत आहेत.
काहींनी तर दिवसातून तीन-चारवेळा संपूर्ण दुकान, शोरुम सॅनिटाईज करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत मार्केटमध्ये अधिकाधिक ग्राहक यायला पाहिजेत आणि खरेदीचा आनंद घेतला पाहिजे याकरिता व्यापाºयांनी विविध योजना, सवलती, उपक्रम राबवत आहेत. इलेक्ट्रॉनिक शोरुममध्ये पूर्वी दहा ते पंधरा टक्के सूट मिळत होती.
आता यापुढे भरघोस सूट देण्यात येणार आहे. २० ते ३० टक्क्यापर्यंत सूट देण्यात येणार आहे, असे व्यापारी सांगताहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकरिता फायनान्स उपलब्ध करणाºया कार्पोरेट कंपन्यांकडून देखील विविध आॅफर जाहीर झाल्या आहेत.
संपूर्ण शोरुम होईल तीनवेळा निर्जंतुकीकरणशोरुमसमोर आम्ही सॅनिटाईज टनेल उभारला आहे. शोरुममध्ये येणाºया ग्राहकांना गरम पाणी प्यायला देणार आहोत, तेही कागदी ग्लासमध्ये. तसेच ग्राहकांना टोकन नंबर देणार आहोत. टोकन नंबरनुसार त्यांना कपडे खरेदी करता येईल. जे कस्टमर फोनवरून माहिती घेतात त्यांना आम्ही ठराविक वेळेलाच येण्याची विनंती करणार आहोत. शोरुममध्ये गर्दी होऊ नये याची पुरेपूर काळजी घेणार आहोत.दिवसातून तीनवेळा संपूर्ण शोरुम निर्जंतुकीकरण करणार आहोत.- राजेश पवार, एम. डी., व्ही. आर. पवार सारीज
एकूण कर्मचाºयांपैकी फक्त वन थर्ड कर्मचाºयांना कामावर बोलावले आहे. सुरुवातीच्या काही दिवसात ग्राहकांची मोठी गर्दी राहील, बहुतांश ग्राहकांना आम्ही होम डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतोय. आॅनलाईन डिलिव्हरी सुरु आहे. ग्राहकांना फिजिकल डिस्टन्स बंधनकारक करणार आहोत. सध्या संपूर्णचे शोरुम निर्जंतुकीकरण केले आहे. यंदाच्या हंगामामध्ये एसी, कुलर तसेच रेफ्रीजरेटर यांची विक्री अत्यल्प झाली आहे. या उत्पादनांची खरेदी करणाºयांना २५ ते ३० टक्क्यांची सूट देणार आहोत. फायनान्स कंपन्यांकडून भरघोस सूट दिली जात आहे.- शंतनू बदामीकर, बदामीकर अँड सन्स