सोलापुरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तरुणाईचा कौल कोणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:21 PM2019-04-20T12:21:42+5:302019-04-20T12:24:12+5:30

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली

Who is the convener of the youth union assembly in Solapur city? | सोलापुरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तरुणाईचा कौल कोणाला ?

सोलापुरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तरुणाईचा कौल कोणाला ?

Next
ठळक मुद्देमागील तीन लोकसभा निवडणुकांत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला किती मतदान झाले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.राहुल गांधी झोपडपट्टी, शास्त्रीनगर, इंदिरानगर, माधवनगर, कुमठा नाका, बापूजीनगर, नीलमनगर, जुने विडी घरकूल, बेडरपूल, पद्मशाली चौक या परिसरात चुरशीचे मतदान झाले

राकेश कदम

सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा विचार करता शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारात वाढ झाली असली तरी होणाºया मतदानात किंचित घट दिसून येत आहे. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी ५५.०८ टक्के इतके मतदान झाले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत ५५.४४ टक्के इतके मतदान झाले होते. या वेळेस या मतदारसंघात पुरुष: १,३७,२१६ व महिला: १,३०,६८८ असे २,६७,९०४ इतके मतदार होते. प्रत्यक्षात पुरुष: ८०,२३५ व महिला: ६८,३०४ असे १,४८,५३९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पाच वर्षांनी या मतदारसंघात २३ हजार ७६७ मतदारांची भर पडली. या लोकसभेसाठी शहर मध्य मतदारसंघात महिला: १,४७,४३१ व पुरुष: १,४४,२३३, तृतीयपंथी: १० असे २ लाख ९१ हजार ६७४ मतदारांची यादी तयार होती. यापैकी पुरुष: ८४,७५४ व महिला: ७५,९०३ असे १ लाख ६० हजार ६५७ मतदारांनी मतदान केले. या वेळेस मतदान वाढले असले तरी एकूण मतदारांच्या तुलनेत टक्केवारी कमी येत आहे. 

शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करीत आहेत. निवडणूक प्रचारात काँग्रेस, भाजप वंचित आघाडीच्या उमेदवारांनी चुरस निर्माण केली होती. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात श्रमिक मतदारांची संख्या मोठी आहे. वाढलेल्या मतदानात तरुणाईचा सहभाग मोठा आहे. हा कौल पाहणे हेही महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल गांधी झोपडपट्टी, शास्त्रीनगर, इंदिरानगर, माधवनगर, कुमठा नाका, बापूजीनगर, नीलमनगर, जुने विडी घरकूल, बेडरपूल, पद्मशाली चौक या परिसरात चुरशीचे मतदान झाले आहे. 

काय होता मागील कौल
- मागील तीन लोकसभा निवडणुकांत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला किती मतदान झाले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सन २०१४, भाजप: ७५,१८१, काँग्रेस: ५५,८१३, सन: २००९, भाजप: ४६,८९३, काँग्रेस: ५४,९७४, सन २००४, भाजप: ४२,७३५, काँग्रेस: ४६,१४३. या वेळेस तिरंगी लढत होत असल्याने कोण किती मते खेचणार याकडे सर्वांचे लागले आहे. आता मतदारसंघात अनेक जण कोणाला किती मते मिळतील, याचा हिशोब घालत आहेत, पण २३ मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

Web Title: Who is the convener of the youth union assembly in Solapur city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.