कृषी सहाय्यक घुगे खूनप्रकरणात मुलापाठोपाठ संशयित आरोपी म्हणून पत्नीलाही अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:52 PM2020-01-22T12:52:27+5:302020-01-22T13:14:14+5:30
कुर्डूवाडी पोलीसांची कामगिरी; मुलापाठोपाठ संशयित आरोपी म्हणून पत्नी अटकेत
कुर्डूवाडी : बार्शीतील कृषी सहाय्यक अंगद घुगे याच्या खुनप्रकरणात त्याच्या मुलापाठोपाठ संशयित आरोपी म्हणून पत्नीलाही कुर्डूवाडी पोलीसांनी बुधवारी सकाळी अटक केली आहे. ही महिला रूई व रातंजन गावची सध्या कार्यरत ग्रामसेविका आहे.
जयश्री अंगद घुगे (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. १४ जानेवारीपासून बेपत्ता असलेले बार्शी कृषी विभागातील कृषी सहाय्यक अंगद सुरेश घुगे (वय ४३) यांचा खून झाल्याची घटना शनिवारी समोर आली़ या घटनेची अधिक चौकशी करीत असताना हा खून मुलानेच केला असल्याचे समोर आले होते त्यानंतर त्या मुलाला संशियत आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे़ त्यानंतरचा अधिक तपास करीत असताना याच खुनातील कटामध्ये तिच्या पत्नीचा सहभाग असल्याचे निष्पप्न झाल्याने पोलीसांनी अटक केली आहे.
दरम्यान, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस हवालदार दराडे, पोलीस शिपाई सोमवाड, पोलीस हवालदार ललित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ संशयित आरोपी महिला बुधवारी सकाळी भालगांव (ता. बार्शी) पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी अटक केली आहे.