नागेश भोसले यांच्या पत्नी साधना भोसले या मागील सात वर्षांपासून पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी काम करीत आहेत. त्या माध्यमातून पंढरपूर शहरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्याचबरोबर त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात मराठा समाजातील तरुणांना मदत केली होती. यामुळे त्यांचा अर्ज राहिला तर नेमका फायदा कोणाला होईल व तोटा कोणाला होईल यांचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. असे असले तरी नागेश भोसले यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न होणार असल्याचे माजी राज्यमंत्री बाळूभाऊ भेगडे यांनी सांगितले आहे. मात्र, समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज ठेवला, तर समाधान आवताडे यांना डोकेदुखी ठरू शकणार आहे.
फोटो : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले.
फोटो : पंढरपूर येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भाजपच्या प्रमुख नेत्यांसह नगराध्यक्षा साधना भोसले.