बसवराज मठपती।
सोलापूर : आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून जगण्यात आज आम्हाला अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया होती पद्मनगर बास्केटबॉल क्लबच्या मुलींची़ शॉर्ट कपड्यातील मुली सांगताहेत, होय़़ ट्रेंड बदलतोय़... लोकांची नजर बदलतेय!
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालक, समाज म्हणून महिला खेळाडूंकडे यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा? या विषयावर ‘लोकमत’ने महिला खेळाडू, मुलींची प्रतिक्रिया जाणून घेतली़ त्यावेळी महिला पद्मनगर बास्केटबॉल क्लबच्या मैदानावर उपस्थित असलेल्या जवळपास ३० हून अधिक महिला खेळाडू म्हणाल्या, समाजाकडून आज आम्हाला सन्मानाची वागणूक मिळतेय, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
मैदानावर जेव्हा आम्ही खेळाच्या निमित्ताने शॉर्ट ड्रेस घालून उतरतो तेव्हा सर्वांकडून आम्हाला मानसन्मान, आदराची वागणूक मिळतेय़ असा एकदाही अनुभव आलेला नाही की, चुकूनही एखाद्याने आमच्याकडे, पोशाखाकडे तिरकस नजरेने पाहिलं असेल़ मात्र याउलट जेव्हा एखादी मुलगी अथवा महिला समाजात जेव्हा अशा प्रकारच्या शॉर्ट कपड्यांमध्ये वावरतेय तेव्हा मात्र सर्व जण तिच्याकडे कटाक्षाने पाहतात, हाही तितकाच वाईट अनुभव आहे़ समाधान एवढेच की, महिला खेळाडू म्हणून जेव्हा एखाद्याचा सन्मान होतोय तेव्हा अभिमान वाटतोय़ समाजमन बदलतंय अशीच भावना मनामध्ये येऊन जातेय.
महिला म्हटलं की, समाजाचा खास करून पुरुष मंडळीचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो़ ही संकल्पना आता जुनाट होऊ लागली आहे़ अर्थात जगाची जसजशी २१ व्या शतकाकडे कूच होत आहे तसतसा समाज परिर्वतन घडत आहे आणि आधुनिकीकरणाचा समाजमनावर खूप मोठा परिणाम होतोय, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही़ खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिससारख्या खेळांमध्ये महिला खेळाडू सर्रासपणे शॉर्ट कपडे वापरत असतात़ मैदानावर शॉर्ट पँट घालून खेणळाºया मुलींकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन हा सावित्रीच्या लेकी म्हणूनच असतो़ यात आत्मीयता असते़ आपलेपण, आपल्या मुली अशी भावना असते़ कमी कपडे घातले की, पुरुष प्रधान संस्कृतीतही हीच मंडळी तिरक्या नजरेने पाहत असतात़ पण जेव्हा एक मुलगी म्हणून मैदानावर उतरते तेव्हा मात्र याच मंडळींची भावना ही प्रोत्साहनात्मक असते.
मुलींनी पुढे जावे, खेळामध्ये करिअर करावे अशी यांची सर्वसाधारण धारणा निर्माण झाली आहे़ स्पर्धा आणि बाहेरगावी आपल्या मुलींना पाठवायचं, अशी भावना मनात येणाºया पालकांचं ट्रेंड बदलून गेलंय़ पालकांना आता आपल्या मुलींना स्पर्धेनिमित्त बाहेरगावी पाठविण्याबाबत मनात तीळमात्र शंका येत नाही़ खेळाडू महिला म्हणून जेव्हा एखाद्या मुलीकडे पाहिले जाते तेव्हा तिचा सर्वांनाच हेवा, अभिमान वाटतोय़
स्वसंरक्षणासाठी आता मुली सक्षम: अनुराधा थोरात- एरवी मुली अथवा महिला म्हटलं की, तिचा छळ होणे, तिचे शोषण होणे, या सर्वसाधारण ढोबळ संकल्पेतून आता महिला मंडळी बाहेर पडताना दिसून येत आहेत़ मुली आता कराटेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे घेऊन सक्षम बनल्या आहेत, अशी प्रतिक्रिया होती आंतरराष्ट्रीय कराटे पंच व सेन्साई अनुराधा थोरात यांची़ समाजकल्याण विभाग आणि विविध शाळा, संस्थांमध्ये त्यांनी हजारो मुलींना रोडरोमिओ, गुंडांपासून स्वत:चा बचाव कसा करून घ्यायचा याविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यांना स्वसंरक्षणाचे धडेही दिलेले आहेत़