अनगरसह कार्यक्षेत्रातील बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी (अ.), नालबंदवाडी, गलंदवाडी, पासलेवाडी, अनगर स्टेशन, काळेवाडी, कोंबडवाडी येथील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून, कुटुंबास आर्थिक हातभार लावण्यासाठी प्रत्येक महिलांना कर्जवाटप केले. त्यातून महिलांनी शाश्वत उपजीविकेसाठी पशुपालन, शेळीपालन, गोपालन, शेती, विविध मसाले, दुग्ध व्यवसाय, हस्तकला वस्तू, पापड उद्योग, शेवया, शिलाई मशीन, कापड दुकान या उद्योगात ती रक्कम गुंतविली आहे.
यावेळी शाखाधिकारी जगन्नाथ लोटके, कर्ज वितरण अधिकारी सुजीत सोनवणे, गणेश बडगंडी, वंदना हैनाळकर, पाचपीर गायकवाड, समाधान गुंड, मंजूर बागवान यांच्या हस्ते बचत गटाच्या अध्यक्ष सुनंदा गुंड, उज्ज्वला ढेरे, सचिव वर्षा गुंड, अनिता झांबरे, सदस्या रेखा गुंड, जया गुंड, शालन गुंड, उमा पवार, काजल थिटे, वैशाली झांबरे, उमा झांबरे आशा धावणे, सुमन शिंदे, वैशाली सावंत, सुरेखा डवरी, रतन निकम, कविता थिटे, अनिता घोगरे, सुषमा उंबरे, राजश्री वराळे, सुभद्रा झांबरे आदी महिलांना ही रक्कम देण्यात आली.
बँकेने आम्हाला दिलेली ही रक्कम कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल, असे सुनंदा गुंड यांनी सांगितले.
२९अनगर०१
अनगर येथील बँक ऑफ बडोदातर्फे महिला बचत गटांना कर्ज वितरणप्रसंगी शाखाधिकारी जगन्नाथ लोटके, सुजीत सोनवणे, गणेश बडगंडी, वंदना हैनाळकर, सुनंदा गुंड, वर्षा गुंड आदी.