घरखर्चाला पैसे आणतो म्हणून गेलेल्या युवकाचा सोलापुरात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:59 AM2019-01-03T10:59:57+5:302019-01-03T11:00:43+5:30

सोलापूर : उद्या कामाला जातो, दोन-तीनशे रुपये घरखर्चाला घेऊन येतो असे सांगून पहाटे ५ वाजता घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अज्ञात ...

The youth who passed away as a money launderer murdered in Solapur | घरखर्चाला पैसे आणतो म्हणून गेलेल्या युवकाचा सोलापुरात खून

घरखर्चाला पैसे आणतो म्हणून गेलेल्या युवकाचा सोलापुरात खून

Next
ठळक मुद्देअज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकारया प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

सोलापूर : उद्या कामाला जातो, दोन-तीनशे रुपये घरखर्चाला घेऊन येतो असे सांगून पहाटे ५ वाजता घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आला. 

सागर प्रकाश सरवदे (वय २५, रा. २७/क, जोशी गल्ली, रविवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर सरवदे हा आई निर्मला, वडील प्रकाश, दोन बहिणीसोबत जोशी गल्ली येथे राहात होता. हे कुटुंब गेल्या ४0 वर्षांपासून काळा पोलीस चौकी, लालबाग मुंबई येथे राहत होते. हे कुटुंबीय अधूनमधून सणाला, देवकार्याला सोलापुरात येत होते. सागर सरवदे याचा चुलत आजोबा सिद्राम भोसले हा मयत झाल्याने सर्व कुटुंबीय सोलापुरात आले होते. वडील प्रकाश हे आजारी पडल्यामुळे सर्वजण गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून सोलापुरात राहत होते. सोलापुरात उदरनिर्वाहासाठी सागर हा मार्केट यार्डात हमाली काम करण्यासाठी जात होता. 

सागर सरवदे रोज पहाटे ५ वाजता जाऊन सकाळी १0 वाजता घरी येत होता. मंगळवारी रात्री ८.३0 वाजता सागर सरवदे हा घरी आला. सर्वजण जेवण करून बसले होते तेव्हा सागर आईला म्हणाला की, उद्या सकाळी मी यार्डात कामाला जातो दोन-तीनशे रूपये घेऊन येतो. रात्री ११.३0 वाजता सागर सरवदे त्याच्या दुसºया खोलीत झोपण्यासाठी गेला. बुधवारी पहाटे ५ वाजता उठून तो नेहमीप्रमाणे कामाला निघून गेला. सकाळी ७ वाजता नंदना ही मावशी मावशी म्हणत सागरच्या घराचा दरवाजा वाजवू लागली. आई निर्मला सरवदे यांनी दार उघडले असता नंदना हिने सागरला पिठाच्या गिरणीच्या बोळात कोणीतरी मारून टाकले आहे असे सांगितले. 

आई आणि दोन बहिणी भुलाभाई चौकाजवळील पिठाच्या गिरणीजवळ धावत गेल्या. तेथे सागर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जवळच मोठा दगड आणि फरशीचे तुकडे पडले होते. काही वेळात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील करीत आहेत. 

मुंबईचा बेत फसला... सागरचा सोलापुरात घात झाला...
च्सागर सरवदे हा काळा पोलीस चौकी, लालबाग मुंबई येथेही राहत होता. तो तेथील गणेश हॉलमध्ये काम करीत होता. ३ ते ४ महिन्यांपासून सोलापुरात राहिल्यानंतर पुन्हा तो आई-वडिलांसह पुन्हा मुंबईला जाण्याच्या तयारीत होता. मुंबईला जाण्याची तयारीही झाली होती. खर्चाला पैसे होतील या आशेपोटी सागर घरातून बाहेर पडला होता; मात्र त्याचा खून झाल्याची वार्ता घरी समजली आणि आई, वडील, दोन बहिणींनी घटनास्थळी सागरला पाहून टाहो फोडला. 

च्सागर याला दोन भाऊ असून तेही करून खाण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या प्रकारामुळे रविवार पेठेत खळबळ उडाली आहे. 
च्खून कोणी केला, कशासाठी केला याचा अद्याप तपास लागला नाही. पोलिसांनी संशयावरून जोशी गल्लीतील एकास ताब्यात घेतले आहे. 

Web Title: The youth who passed away as a money launderer murdered in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.