कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी झेडपीच्या सीईओनी टेबलावर बसविला काचेचा बॉक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:26 PM2020-08-25T16:26:00+5:302020-08-25T17:09:08+5:30
काचेच्या हेल्मेटचा वापर: फॉगिंग मशीनद्वारे कार्यालयात केला जातो धूर
सोलापूर: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोण काय काय उपाययोजना करीत आहेत, याचे मजेशीर किस्से पाहायला मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी आपल्या केबिनमधील टेबलावर चक्क काचेची संरक्षक भिंत उभी केल्याचे दिसून येत आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यावर यासाठीच्या प्रतिबंध व उपाय योजनेसाठी प्रशासनातील अनेक अधिकारी झटून कामाला लागले. गेली पाच महिने अधिकारी महामारीच्या उपाययोजनेसाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. अधिकाºयांची हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. हे काम करीत असताना बºयाच अधिकाºयांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. पण बºयाच अधिकाºयांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे. पूर्ण विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्याचे दिसून येत आहे.
कोरोना उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी अधिकाºयांना वारंवार दौरा करावा लागत आहे. यातून संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी मास्क, हॅन्डग्लोजबरोबरच काचेच्या हेल्मेटचा उपयोग केला होता. गर्दीत संवाद साधताना नाक व डोळ्याद्वारे होणारा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या हेल्मेटचा उपयोग होतो असे सांगण्यात आले होते. पण या हेल्मेटची काच अवजड असल्याने त्यांना वारंवार त्याचा वापर करणे शक्य झाले नाही. कार्यालयात मुख्य आसनांपासून दूरवर इतरांना बसण्यासाठी खुर्च्या व त्यामध्ये अंतर अशाही खबरदारी घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कार्यालयात भेटण्यासाठी व बैठकांसाठी येणाºयांना मास्क, हाताला सॅनिटायझर व कार्यालयात येताना थर्मल गनद्वारे टेंपरेचर तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनीही आत्तापर्यंत कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यात यश मिळवले आहे. आत्तापर्यंत यांनी जिल्हा प्रशासनाच्या विविध बैठकांना हजेरी लावली व विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत पण फिजिकल डिस्टन्स पाळल्यामुळे आपल्याला विषाणूची बाधा झाली नाही, असा त्यांचा दावा आहे.
अलीकडे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाºयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आगंतुक येणाºया लोकांपासून संसर्ग होऊ नये म्हणून वायचळ यांनी आपल्या टेबलावर काचेची भिंत तयार केली आहे. यामुळे संवाद साधणाºयापासून दूर राहता येते व विषाणू काचेवरच थांबतात, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय कार्यालयातील विषाणूंचा मारा करण्यासाठी दररोज सकाळी फॉगिंग मशीनद्वारे सॅनीटायझरचा धूर केला जात आहे. कोरोना विषाणूपासून पदाधिकाºयांनाही अशी सुरक्षा मिळावी, अशी मागणी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केली आहे. कर्मचाºयांना आरोग्याच्या टिप्सजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली यांनी कोरोना विषाणूपासून बचाव कसा करायचा याबाबत कार्यालयीन कर्मचाºयांनाही टिप्स दिल्या आहेत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे आणि केव्हा खावे याबाबतीत ते वारंवार मार्गदर्शन करताना दिसत आहेत.