Infinix नं आपल्या Infinix Note 12 सीरिजचा विस्तार केला आहे. Note 12 नंतर आता केनियामध्ये Infinix Note 12i स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट, 7GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh बॅटरी अशा दमदार स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Infinix Note 12i स्मार्टफोनची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्स.
Infinix Note 12i स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 12i स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉटरड्रॉप नॉच असलेला पॅनल 20.5:9 आस्पेक्ट रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळतो. सोबत 4GB रॅम आणि 3GB व्हर्च्युअल रॅम मिळतो. या फोनमध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. Infinix Note 12i स्मार्टफोन Android 12 वर आधारित XOS 10.6 युआयवर चालतो.
बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात क्वॉड एलईडी फ्लॅश, 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा सेकंडरी कॅमेरा आणि एक AI लेन्स देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा 8MP चा सेन्सर आहे, परंतु त्यासोबत मिळणारा ड्युअल एलईडी फ्लॅश याची खासियत म्हणता येईल. Infinix Note 12i स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करतो.
Infinix Note 12i ची किंमत
Infinix Note 12i स्मार्टफोन केनिया मध्ये 20,500 KES (सुमारे 13,000 रुपये) मध्ये उपलब्ध झाला आहे. हा फोन सनसेट गोल्डन, ज्वेल ब्लू आणि फोर्स ब्लॅक कलरयामध्ये विकत घेता येईल. लवकरच हा फोन भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.