देशात लवकरच '5G' ची क्रांती; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 11:49 AM2020-12-08T11:49:40+5:302020-12-08T11:50:20+5:30

Reliance Jio 5G, Mukesh Ambani news: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

'5G' revolution in the country soon; Jio's Mukesh Ambani's big announcement | देशात लवकरच '5G' ची क्रांती; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

देशात लवकरच '5G' ची क्रांती; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

googlenewsNext

भारतीय बाजारपेठेत 5G च्या स्मार्टफोननी रुंजी घालायला सुरुवात केली आहे. २० ते ३० हजारांत वनप्लस, मोटरोला, व्हिवोचे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. कोणाचा स्मार्टफोन किती स्वस्त, त्यामध्ये प्रोसेसर कोणता आदी चर्चा होत असतानाच देशात 5G नेटवर्क कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. 


रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी दुसऱ्या सहामाहीत भारतात रिलायन्स जिओ (Reliance Jio) 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. तसेच यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जेव्हापर्यंत सोपे धोरणात्मक बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग व स्वस्त बनविले जाणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाहीय, असेही ते म्हणाले. 

Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर


2021 मध्ये जिओ भारतात '5G' ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल. याशिवाय हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीदेखील स्वदेशीच असणार आहे. जिओच्या माध्यमातून आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहोत. भारताला '5G' स्पेक्ट्रमवर लवकरात लवकर निर्णय़ घ्यावा लागणार आहे. सोबतच जिओ ही '5G' क्रांतीची लीडर ठरणार आहे.  येत्या काही दिवसांत भारतात सेमी कंक्टरचा उत्पादन हब होण्याची शक्यता आहे. आम्ही सेमी कंडक्टरच्या आयातीच्या भरवश्यावर राहू शकत नाही, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. 

भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन लाँच; जाणून घ्या Moto G 5G ची किंमत आणि फिचर्स


देशात सध्या 30 कोटी 2G फोन वापरणारे आहेत. त्यांच्यापर्यंत स्मार्टफोन पोहोचण्याची गरज आहे. यासाठी नीतिगत हस्तक्षेपाची गरज आहेय  अंबानी यांनी सांगितले की, आम्ही डिजिटली खूप चांगल्याप्रकारे जोडले गेलो आहोत. तरीही ३० कोटी लोक अद्याप टूजी वापरत आहेत. 

‘फाइव्ह जी’मुळे होणारे बदल

‘फाइव्ह जी’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत. ३१ जुलै १९९५ रोजी मोबाइलचे तंत्रज्ञान भारतात दाखल झाले. तेव्हा एका मिनिटाच्या कॉलसाठी १६.८० रुपये मोजावे लागत होते. आता व्हॉइस कॉल जवळपास विनामूल्य झाले आहेत. चीनपाठोपाठ सर्वाधिक मोबाइल ग्राहक भारतात आहेत. या लक्षणीय प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण होत असून यापुढील दूरसंचार क्षेत्रातील वाटचाल अधिक आश्चर्यकारक असेल, अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट आॅफटेक्नॉलॉजीचे संचालक अभय करंदीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


‘टू जी’मध्ये फक्त संभाषण शक्य होते. ‘थ्री जी’मध्ये डेटा दाखल झाला, मात्र त्याचा वेग अत्यंत कमी होता. ‘फोर जी’ दाखल झाल्यानंतर केवळ वेगच वाढला नाही तर आपले संभाषणही डेटाच्या माध्यमातून सुरू झाले. परंतु, हे तंत्रज्ञान फोन, टॅब आदींपर्यंतच मर्यादित होते. ‘फाइव्ह जी’मध्ये इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड १० पटीने वाढणार असून मशिन टू मशिन संपर्क यंत्रणा स्थापन करणे शक्य होणार आहे. त्या परिस्थितीत असंख्य कामांसाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरजच शिल्लक राहणार नाही. ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’चे हे युग असेल. दैनंदिन जीवनातले अनेक घटक या यंत्रणेच्या माध्यमातून जोडले जाणे शक्य होईल. त्यानंतर येणाऱ्या ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजीमुळे आपण डिजिटल वर्ल्डमध्ये प्रवेश करू, असे करंदीकर यांनी सांगितले. इंटरनेट दाखल झाल्यानंतर कोणत्या नावीन्यपूर्ण गोष्टी (इनोव्हेशन) येतील याची कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे फाइव्ह आणि सिक्स जी तंत्रज्ञान कोणकोणत्या नव्या संकल्पना आणि बदलांना जन्म देते हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील
१९८९ साली संगणक दाखल झाल्यानंतर लाखो नोकºया जातील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ती निरर्थक ठरली. त्याच धर्तीवर ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील, ही भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, तो धोका टाळायचा असेल असेल तर बदलत्या परिस्थितीनुसार नवनवी कौशल्य आत्मसात करावी लागतील, असे करंदीकर यांनी स्पष्ट केले.

सुरक्षेचा धोका अपरिहार्य
तंत्रज्ञानाच्या या अनिर्बंध शिरकावामुळे वैयक्तिक पातळीवर सायबर सुरक्षेचे अनेक मुद्दे उपस्थित होतील. ते अपरिहार्य आहेत. मात्र, नवे तंत्रज्ञान विकसित करताना रिस्क मॅनेजमेंटवर निश्चितच भर दिला जाईल. तसेच, वैयक्तिक पातळीवरही सुरक्षेबाबत प्रत्येकालाच अधिक सजग व्हावे लागणार आहे.

पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यान
देशात मोबाइलद्वारे पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यान करण्यात आला. कोलकाता येथील रॉयटर्स इमारतीमधून ज्योती बसू यांनी नवी दिल्लीतील संचार भवनात असलेल्या सुखराम यांना तो केला होता. मोदी टेल्स्ट्रा नामक कंपनीच्या मोबाइल नेट सेवेद्वारे हा कॉल करण्यात आला होता.

Read in English

Web Title: '5G' revolution in the country soon; Jio's Mukesh Ambani's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.